रमाई आवास लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांवरून अनुदान साडे तीन लाख रुपये करा* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समरजितसिंह घाटगेंची निवेदनाद्वारे मागणी*

Spread the news

*रमाई आवास लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांवरून अनुदान साडे तीन लाख रुपये करा*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समरजितसिंह घाटगेंची निवेदनाद्वारे मागणी*

कागल,प्रतिनिधी.
रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान साडेतीन लाख रुपये करावे. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे घाटगे यांनी सांगितले.

निवेदनातील मजकूर असा.
अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्याचे निवाऱ्याचा प्रशन सुटावा म्हणून त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेतून शासनाकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे या अनुदानाच्या रकमेत हे घरकुल बांधताना लाभार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सध्या देण्यात येणाऱ्या अडीच लाख रुपये अनुदान रकमेमध्ये एक लाख रुपयांची वाढ करावी व अडीच लाख रुपयांवरून हे अनुदान साडेतीन लाख रुपये इतके करण्यात यावे.

छायाचित्र मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये देण्यात येणारे अनुदान साडेतीन लाख रुपये करावे या मागणीचे निवेदन देताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!