*छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा वृत्तपत्र विक्रेत्यांनी कृतीतून चालविला*
*समरजितसिंह घाटगे*
*वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त विक्रेत्यांचा केला सन्मान*
मुरगुड,प्रतिनिधी.
छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा वृत्तपत्र विक्रेते कृतीतून चालवित आहेत.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मुरगुड येथे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सन्मान सोहळा वेळी ते बोलत होते.
यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा घाटगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान केला.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सहकार तसेच डाव्या विचारसरणीच्या लोकांसह वृत्तपत्र क्षेत्रालाही पाठबळ दिले, त्यासाठी प्रसंगी टीका सोसली.ऊन,वारा, पाऊस, महापूर, कोरोना अशा विपरीत परिस्थितीतसुद्धा वृत्तपत्र विक्रेते वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून अविरतपणे सेवा देतात. म्हणूनच छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह थोर पुरुषांचे विचार व घडामोडी घरोघरी वेळेत पोहोचतात.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या महामंडळास भरीव निधी उपलब्ध करून देण्यासह इतर योजनांचे लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी कुटुंबातील सदस्य म्हणून ठामपणे उभा राहणार आहे. या निमित्ताने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्याचे भाग्य मला मिळाले.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवगोंडा खोत म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे भक्कमपणे राहणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या नेतृत्वास साथ देऊया.
तालुकाध्यक्ष शिवाजीराव मगदूम म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करून अर्धी लढाई जिंकली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण करणारा कायदा आणण्यासाठी राजे साहेब यांनी प्रयत्न करावेत. वृत्तपत्र विक्रेते त्यांच्या पाठीशी ठाम राहतील.
यावेळी मधुकर सुतार,किरण व्हनगुत्ते यांनीही मनोगत व्यक्त केले.
शाहूचे संचालक प्रा.सुनिल मगदूम यांनी स्वागत केले.आर वाय वर्धन यांनी आभार मानले.
छायाचित्र मुरगुड येथे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मेळाव्यात विक्रेत्यांच्या सन्मानवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे
शाहू जनक घराण्याकडून सत्कार नव्हे गौरव
वृत्तपत्र विक्रेता म्हणजे समाजातील एक दुर्लक्षित घटक. त्यांना आजपर्यंत कोणीही मानसन्मान दिला नाही. तो छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला. त्यामुळे त्यांच्या हस्ते झालेला हा सत्कार नसून विक्रेत्यांसाठी एक प्रकारचा गौरवच आहे. असे प्रतिपादन यावेळी रघुनाथ कांबळे यांनी केले..