छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार डॉ. जे. के. पवार यांना जाहीर*

Spread the news

*छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार डॉ. जे. के. पवार यांना जाहीर*

कोल्हापूर- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा “छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार २०२४” शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित ‘राजर्षी शाहूंची वाड्मयीन स्मारके’ या बृहद्ग्रंथाला जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण अहमदनगर (अहिल्यानगर) येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे २५ डिसेंबर रोजी होणार आहे, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षामध्ये या पुस्तकास तिसरा साहित्य पुरस्कार मिळत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या १८० ग्रंथांचा परिचय डॉ. पवारांनी या ग्रंथात करून दिला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे एकूण सहा ग्रंथ डॉ. पवार यांनी लिहिले आहेत.

डॉ. पवार यांनी आतापर्यंत ३० ग्रंथांचे लेखन व संपादन केले असून त्यापैकी १६ पुस्तकांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचा सन २०१४ चा सी. डी. देशमुख पुरस्कार त्यांच्या अर्थायन या ग्रंथास मिळाला आहे. डॉ. पवार यांना आजवर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ३२ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच त्यांनी विविध दैनिकातून आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!