हातकणंगलेतून शिवसेनेच्या वतीने चेतन नरके

ठाकरे गट लढणार हा मतदारसंघ

Spread the news

शिवसेना ठाकरे गट लढणार हातकणंगले लोकसभा

चेतन नरके असणार उमेदवार

डॉ. सुजित मिणचेकर स्पर्धेत

धक्कादायक उमेदवारीची शक्यता अधिक

राजू शेट्टी यांना शह मिळणार

धक्कादायक उमेदवारीची शक्यता का ?

कारणासाठी नक्की वाचा

*महाधुरळा डॉट कॉम*

कोल्हापूर/ प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने लढण्याचा निर्णय निश्चित केला आहे. उमेदवार म्हणून चेतन नरके यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असून डॉ. सुजित मिणचेकर यांचेही नाव चर्चेत आहे

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा होता; पण, तो काँग्रेसला देण्यात आला. या बदल्यात सांगलीची जागा देण्याबाबत चर्चा झाली. पण, त्याचा निर्णय अद्याप झाला नाही. हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीने न लढवता आपल्याला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी दोन वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. पाठिंबा देणार नाही आपण शिवसेना पुरस्कृत म्हणून लढा असा प्रस्ताव त्यांना दिला. पण शेट्टी यास तयार नाहीत. त्यांना आघाडीचा पाठिंबा हवा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेतून हातकणंगलेची जागा शिवसेना लढवणार हे निश्चित करण्यात आले. त्यासाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्यानंतर चेतन नरके यांना संधी देण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. गेल्या अडीच वर्षापासून नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी तयारी करत आहेत. प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेले ते एकमेव उमेदवार आहेत. उच्चशिक्षित आणि वेगळं काहीतरी करण्याची धडपड असं त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांनाच हातकणंगलेतून उमेदवारी देण्याचा विचार पुढे आला.

गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून या मतदारसंघातही त्यांचा चांगला संपर्क असल्याने त्यांच्या नावाचा विचार झाल्याची समजते. यामुळे नरके यांना कोल्हापूर ऐवजी हातकणंगलेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

या मतदारसंघातून लढण्यासाठी माजी आमदार मिणचेकर इच्छुक आहेत. त्यांची मतदार संघात धडपडणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे. मतांची बेरीज ही चांगली आहे. शाहूवाडी. हातकणंगले, इचलकरंजी परिसरात त्यांचा संपर्क चांगला आहे. त्याचा फायदा होईल म्हणून आपल्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे.
या पार्श्वभूमीवर आता नरके की मिंचेकर याचा फैसला दोन दिवसात होण्याची दाट शक्यता आहे.

शेट्टी यांनी पुरस्कृत उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेने लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्याने शेट्टी यांना त्याचा दणका बसला. यंदा पुन्हा तिरंगी लढत झाल्यास कोणाला फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी शेट्टी यांच्या एकला चलो रे भूमिकेला शह देण्यासाठी महायुती बरोबरच आता महाविकास आघाडी ही मैदानात उतरणार असल्याने या मतदारसंघात चुरस वाढण्याची शक्यता वाढली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!