चेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विजयाचा पाया करवीरमध्ये रचणार,, चेतन नरके करवीर-पन्हाळा- गगनबावडा तालुक्यात महाविकास आघाडीची ताकत आणखी वाढली करवीरमध्ये नवी राजकींय समीकरणे, चेतन नरकेंची विरोधकांना तराटणी

Spread the news

चेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा !

विजयाचा पाया करवीरमध्ये रचणार,, चेतन नरके

करवीर-पन्हाळा- गगनबावडा तालुक्यात महाविकास आघाडीची ताकत आणखी वाढली

करवीरमध्ये नवी राजकींय समीकरणे, चेतन नरकेंची विरोधकांना तराटणी

कोल्हापूर : “समतेचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती यांना बिनशर्थ पाठिंबा देत आहे. काँग्रेस, महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष आणि नरके गट एकत्र आल्यामुळे शाहू छत्रपतींच्या विजयाचा पाया करवीर तालुक्यात रचला जाईल.’’ अशी ग्वाही गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली.

 

करवीर तालुक्यातील वाकरे फाटा येथील श्री विठाई चंद्राई लॉन येथे आयोजित नरके गटाच्या मेळाव्यात गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी उमेदवार शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार

सतेज पाटील, करवीर मतदारसंघातील आमदार पी.एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात बोलताना चेतन नरके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. निवडणुकीची तयारी ते यंदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. भविष्यातील राजकीय वाटचालीचा दिशा कोणती असेल हे ठरविणारा हा मेळावा असल्याचे सांगून नरके

म्हणाले, ‘ लोकसभा लढवायची म्हणून गेल्या अडीच वर्षापासून मी जिल्हाभर संपर्क दौरा केला. सामान्य माणसांशी नाळ जोडली. त्यांच्या हृदयात स्थान मिळवले. मेळाव्याला झालेली गर्दी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आहे.

नरके म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे विचार हे संपूर्ण समाजाला आणि देशाला तारणारे आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे समतेच्या विचाराचा हा वारसा पुढे चालवित आहेत. त्यांची आणि माझे वडील अरुण नरके यांची ५० वर्षापासून मैत्री आहे. शाहू छत्रपती आणि माझी वैचारिक बैठक जुळली आहे. त्यांना पाठिंबा देत आहे. येथून पुढे आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार आणि राजकारणात काम करू. आम्ही सगळे एकत्र आलो आहोत, ही नव्या राजकारणाची समीकरणे आहेत.’असेही चेतन नरके यांनी नमूद केले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘चेतन नरके यांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी सहकार आणि समाजकारणात पुण्याई मिळवली आहे. पुण्याईचा तो वारसा सांभाळून ठेवण्याची जबाबदारी चेतन नरके यांची आहे. त्यांनी गेली अडीच वर्ष स्वत:च्या प्रचारासाठी मोठे कष्ट घेतले होते. वाडया वस्त्यावर जाऊन संपर्क साधला होता.त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेसचा आग्रह शाहू छत्रपतींसाठी राहिला. मात्र त्यांनी जे कष्ट घेतले ते भविष्यात वाया जाऊ देणार नाही. त्यांनी आता शाहू छत्रपतींसाठी दोन पावले पुढे जाऊन प्रचार करावा.’

याप्रसंगी उमेश नरके, युवराज काटकर, रणजित पाटील, प्रकाश मोरे, संतोष शेळके, शिवसेनेचे सुहास पाटील यांची भाषणे

झाली.चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. मेळाव्याला सत्यशील संदीप नरके, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर, यूथ बँक संचालक विश्वास पाटील, आनंदा बेलेकर, दगडू टोपकर, संजय मोरे, रंगराव मोळे, एस. के पाटील, अशोक पाटील, पैलवान संभाजी पाटील, चंद्रकांत जाधव, तेजस मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.

………………

चेतन नरके यांची विरोधकांना तराटणी,

चेतन नरके म्हणाले, ‘आमच्या गटाबद्दल काही जण बोलत आहेत. लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन नरके यानी काय मिळवले अशी चर्चा काही जण करत आहेत. अडीच वर्षात जे मी मिळवले आहे, ते आता माझ्यासोबत आहे. यामुळे त्यांनी आमची काळजी करू नये. स्वत:ची माणसे आणि गट सांभाळावीत. पन्हाळा, करवीर तालुक्यातील नरके गटाच्या कार्यकर्त्याला कोणतीही अडचण असू दया, मला संपर्क साधा, तुमच्यासाठी २४ तास दरवाजे खुले आहेत. सत्तेच्या ताकतीवर कोणी आमच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे गाठ चेतन नरकेंशी आहे. आता सतेज पाटील सोबत आहेत. कोणी माझ्या आडवे पाय मारण्याचा प्रयत्न केला तर तर मलाही

आता कुंभीसहित इतर राजकारणावर बोलावे लागेल.’अशा शब्दांती त्यांनी तराटणी दिली.

……………..

छत्रपतींविषयी प्रचंड आदर, ५० वर्षापासूनची मैत्री

गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, ‘शाहू छत्रपती यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. ५० वर्षाची मैत्री आहे. केएसएत मी पदाधिकारी आहे. कौटुंबिक स्नेह आहे. त्यांच्या हस्ते माझा अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सत्कार झाला होता. इतके ऋणानुबंध आहेत. म्हणून चेतनला मीच म्हटलं

निवडणूक लढविण्यासंबंधी फेरविचार कर. त्यांनी ऐकलं. महाराजांना पाठिंबा दिला”

……………………..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!