चेतन मोटर्स – टाटा मोटर्स ILMCV ट्रक महोत्सव उत्साहात संपन्न..!!
कोल्हापूर
चेतन मोटर्स आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या ट्रक महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते.
या ट्रक महोत्सवाच्या माध्यमातून चेतन मोटर्स आणि टाटा मोटर्स यांचे ग्राहकांसोबत असणारे व्यावसायिक संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच टाटा ILMCV श्रेणीच्या ट्रकच्या संदर्भातील माहिती देण्याच्या हेतूने या ट्रक महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते.
ILMCV वाहनांची श्रेणी ही अत्यंत लोकप्रिय असून अल्पावधीमध्येच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. या श्रेणी मध्ये 2 टन ते 13 टन पासिंग सह 1+2 सुविधा प्राप्त असलेल्या वाहनाचा समावेश होतो.
ह्या रेंज मधील ILMCV वाहणाची मागील वर्षभरात हायेस्ट सेलर मॉडेल, मायलेज बादशहा,किंग ऑफ रोड असे अनेक अवॉर्ड मिळाले आहेत.
मॉडेल ऑफ THE इयर म्हणून LPT 1916 ला सन्मानीत करण्यात आले आहे.
वीस वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये चेतन मोटर्सच्या माध्यमातून टाटा मोटर्सच्या कमर्शियल वाहनांच्या विक्रीला सुरुवात झाली. टाटा मोटर्सने २००५ मध्ये आणलेल्या टाटा एस म्हणजेच छोटा हत्तीच्या स्वरूपात चेतन मोटर्स खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचला.
उंचगाव मध्ये असणाऱ्या पहिल्या शाखेनंतर जिल्ह्यातील ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देता यावी, म्हणून गडहिंग्लज, इचलकरंजी येथे स्वतःची आधुनिक वर्कशॉप्स सुरू केली. हायवेवरून जाणाऱ्या मोठ्या वाहनधारकांसाठी गोकुळ शिरगाव येथे कंटेनर वर्कशॉप सुरू केले.
टाटाच्या कोणत्याही वाहनातील कितीही क्लिष्ट समस्या असो. चेतन मोटर्सचे टेक्निशियन्स ही समस्या सोडविणारच. यामुळे टाटा मोटर्समध्ये चेतन मोटर्सची वेगळी ओळख आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून चेतन मोटर्सला २०१७ मध्ये सांगली जिल्ह्यात वाहन विक्री, विक्री पश्चात सेवा पुरवण्यासाठी टाटा मोटर्सने संधी दिली. चेतन मोटर्सने संधीचे सोनं केले. अल्पावधीतच जत, डिग्रज, कामेरी (वाघवाडी फाटा) येथेही विक्री, विक्री पश्चात सेवा सुरू केली.
ग्राहक सेवा हाच चेतन मोटर्स भक्कम पाया असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चेतन मोटर्सकडून आज पर्यंत 35 हजारांहून अधिक वाहनांची विक्री करण्यात आली असून ५ लाखहून अधिक वाहनांना सर्व्हिस देण्यात आली आहे. विक्री सोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेल्स आणि सर्विस पॉईंट च्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेशी सदैव तत्पर आहे.
चेतन मोटर्सच्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सर्व शोरूम्समध्ये ILMCV श्रेणीतील वाहनांसह इतर सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत. यामध्ये एस (छोटा हत्ती), एस सीएनजी, एस इलेक्ट्रिक, टाटा योध्दा, कन्स्ट्रक्शन व्यवसायासाठी लागणारी वाहनं, प्रवासी वाहतुकीसाठी टाटा विंगर, टाटा मॅजिक, विद्यार्थ्यांसाठी स्कुल बसेस, वगैरे उपलब्ध आहेत अशी माहिती चेतन मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तेज घाटगे यांनी दिली.