महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या, लोकसभा निवडणुकीचा दणका
कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत अडसूळ व उपायुक्त शिल्पा दरेकर या तीन अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्यांना दणका बसला. जाधव सहा महिन्यापूर्वीच महापालिकेत आले होते, तर अडसूळ यांना सहा महिन्यापूर्वीच बढती मिळाली होती. हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांची बदली झाली. एकाचवेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाल्याने आणि नवीन नियुक्ती न झाल्याने महापालिकेला आता नव्या नियुक्तीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.