हुकूमशाही विरोधात सुरू असलेल्या माझ्या लढ्याला जनतेने साथ द्यावी
चंद्रदीप नरके यांचे आवाहन
गगनबावडा
एका नेत्याने गगनबावडा तालुक्यात कूटनीतीचा वापर करून लोकांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त केले, गगनबावडा तालुक्यावर हुकूमशाही आणली अशा हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध माझा लढा सुरू असून या लढ्याला गगनबावडा तालुक्यातील जनतेने पाठबळ द्यावे आणि विधानसभेत विजयी करावे असे भावनिक आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
वेतवडे (ता. गगनबावडा) येथे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ भैरवनाथ मंदिर परिसरात आयोजित केलेल्या विराट सभेत माजी आमदार नरके बोलत होते.अध्यक्षस्थानी केडीसी बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी.शिंदे होते.
माजी आमदार नरके म्हणाले की गगनबावडा तालुक्यातील जनता दबावाखाली आहे. एका नेत्याने तुम्हाला आम्हाला आणि तालुक्यातील सर्व गटांना गिळंकृत केले.गगनबावडा तालुक्यात त्यांनी कारखाना उभा केला, पण तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासदत्व देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले नाही.त्यांना कारखान्याची सत्ता शेतकरी काढून घेतील अशी भीती वाटते काय ? असा सवाल करून आपण सर्व गटाच्या लोकांना कुंभी कारखान्यात १७०० सभासदत्व दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना गगनबावडा तालुक्यातील लोकांवर विश्वास नाही म्हणून ते सभासदत्व देत नाहीत, हिम्मत असेल तर सर्व ऊस उत्पादकांना सभासदत्व द्या असे आव्हान त्यांनी दिले.तुम्ही धन दांडगे आहात, राजकारणात चांगल्या पद्धतीने काम करा,प्रत्येक आमदार आपल्या मुठीत पाहिजे ही प्रवृत्ती बाजूला करा. तरुण पिढीने जागरूक व्हावे आणि झुकणार नाही असा वादा करावा, तुमचा ऊस राहिला तर कुंभी कारखाना आपला ऊस घेऊन जाईल अशी ग्वाही देऊन ही निवडणूक दबाव टाकणाऱ्या नेतृत्वाविरुद्ध आहे. गगनबावड्याच्या स्वाभिमानी जनतेने मर्दासारखे उठायला हवे असे सांगून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
केडीसी बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी. शिंदे यांनी वेतवडे येथे एकत्र आलेला जनसागर चंद्रदीप नरके यांच्या विजयाची नांदी असल्याचे सांगितले. स्वाभिमानाने उभा राहण्याचा राहायचे असेल तर बाहेरून आलेली प्रवृत्ती धुळीस मिळवली पाहिजे असे ते म्हणाले.राजकारणाचा निर्णय चुकला तर पुढील पिढीचे नुकसान होईल म्हणून चंद्रदीप नरके यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी तालुक्यातील दडपशाही, झुंडशाही बंद करून प्रचंड बहुमताने चंद्रदीप नरके यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
नंदकुमार पोवार यांनी विरोधकांनी एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल केला, त्यांच्यात हिम्मत असेल तर संदीप पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल करावा असे जाहीर आव्हान देऊन पी.जी.शिंदेंच्या राजकीय जीवनात अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत आणि आता चंद्रदीप नरके यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत असे ते म्हणाले.
जि.प.माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बडव्यांच्या हातातून काढून घेण्यासाठी चंद्रदीप नरकेंना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
माजी जि.प.सदस्य मेघाराणी जाधव यांनी आपल्या गारीवडे येथील भाषणाचा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करून तमाम महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जागा दाखवून द्यावी व चंद्रदीप नरके यांना विजयी करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक भाजपाचे गगनबावडा तालुका अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांनी केले.यावेळी भाजप ओबीसी सेल अध्यक्ष डॉ. आनंद गुरव,माजी सभापती लहू गुरव, संतोष पारगावकर, युवा नेते राजवीर नरके यांची भाषणे झाली. या विराट सभेला गोकुळचे संचालक अजित नरके, माजी सभापती एकनाथ शिंदे,माजी पं.स. सदस्य आनंदा पाटील, तालुका संघ चेअरमन बंडोपंत पाटील, मामू शेलार,तिसंगी सरपंच सर्जेराव पाटील,माजी सरपंच विठ्ठल कांबळे (लोंघे), शिवसेना गगनबावडा अध्यक्ष तानाजी काटे,पांडुरंग पाटील (धुंदवडे), पांडुरंग पाटील (शेळोशी), युवा सेना तालुका अध्यक्ष इंद्रजीत मेंगाने, सदाशिव पाटील, दादू पाटील, गजानन चौधरी,गणपती पाटील (सेक्रेटरी), इस्माईल तांबोळी (कडवे), बाजीराव गुरव, प्रदीप पाटील, सागर भोसले,राघू पाटील,वासू पाटील (बावेली) यांच्यासह तालुक्यातील सुमारे ५ हजार भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-बावडा विरुद्ध बावडा लढाई-
पी.जी.शिंदे यांनी ही विधानसभेची निवडणूक बावडा विरुद्ध बावडा अशी असून स्वाभिमानाने उभे तुम्हा सर्वांचे दहा हत्तीचे बळ मिळाले आहे असे म्हणतात टाळ्यांचा कडकडाट झाला.
– अन्यथा माझ्याशी गाठ-
चंद्रदीप नरके यांनी तालुक्यातील जनतेवर केडीसी बँकेच्या माध्यमातून राजकीय कारवाई करू नका, कोणाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे असा खणखणीत इशारा दिल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
वेतवडे :येथे आयोजित केलेल्या विराट प्रचार सभेत बोलताना शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके व केडीसी बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी.शिंदे