करवीरच्या विकासासाठी चंद्रदीप नरकेना साथ द्या
राजलक्ष्मी खानविलकर यांचे आवाहन
खानविलकर कुटुंब नरकेंच्या प्रचारात
वडणगे
करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये पंचवीस वर्षे सातत्याने विकासाचा ध्यास घेऊन स्व.दिग्वीजय खानविलकर यांनी अविरत कार्य केले. त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन चंद्रदीप नरके यांनी केलेल्या कामामुळे करवीरमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. ही विकासाची घोडदोड चालू ठेवण्यासाठी राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी, विकास कामांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात करवीर मतदारसंघ अव्वल ठेवण्यासाठी नरकेंना साथ द्या असे आवाहन राजलक्ष्मी खानविलकर यांनी केले
महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ वडणगे (ता. करवीर) येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी तंटामुक्त चे अध्यक्ष कृष्णात जामदार होते. विश्वविजय खानविलकर प्रमुख उपस्थित होते
यावेळी खानविलकर पुढे म्हणाल्या की भारताची विकसनशील देश म्हणून ओळख आहे. सध्या सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे राज्य ही विकासात अव्वल आहे. स्व.खानविलकर यांच्या स्वप्नातील करवीर घडवण्यासाठी गट – तट न पाहता विकासाला साध देऊन चंद्रदीप नरकेंना मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन केले
गोकुळचे संचालक अजित नरके म्हणाले की, मतदार संघातील गाव – वाड्या वस्त्या आणि मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती समजावून घेऊन विकास कामांचा धडाका चंद्रदीप नरके यांनी लावला आहे प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारांनी या मतदारसंघाचा येणाऱ्या पाच वर्षात भौगोलिक आढावा घेऊन विधानसभेच्या रणांगणात उतरायला हवे होते. विरोधकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमाने संधी मिळाली होती ; पण त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही. मतदारसंघातील गुऱ्हाळ घरांची संख्या ही खूप आहे . गुऱ्हाळ मालकांना न्याय देण्यासाठी चंद्रदीपने मुंबईतील प्रकाश गडावर बसून अनेकदा परवानगी घेऊन आधार दिला.
यावेळी कट्टर शिवसैनिक विश्वास बराले म्हणाले बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना तळागाळात रुजवली, पक्षाच्या पताका गावागावात खेळ लावून वेगवेगळे आंदोलन केली. प्रसंगी अनेक वेळा आंदोलनच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागल्या पण शिवसेना रूजवली. आम्ही शिवसेना जिवंत ठेवली आज त्या शिवसेनेला सत्तेची फळे मिळत आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकांना मानाचे दिवस आले आहेत.धनदांडग्यांच्या राजकारणात कार्यसम्राट उमेदवार निवडून देणे ही काळाची गरज आहे यासाठी वडणगे परिसरातून सर्वाधिक मताधिक्य चंद्रदीप नरके यांना द्यावे असे कळकळीचे आवाहन कट्टर शिवसैनिकांनी केली.
जनार्धन पाटील म्हणाले सहकाराचे मंदिर असणाऱ्या भोगावती कारखान्यात गलथान कारभार करत विरोधकांनी कारखान्याचे कंबरडे मोडले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष असताना एक मतदार संघात काही विकास करता आला नाही त्यांना भौगोलिक दृष्ट्या प्रचंड मोठा असणारे करवीर मतदारसंघाचे दुःख सर्वसामान्यांचे अडचणी काय समजणार अशी ठिका केली
इंद्रजीत पाटील म्हणाले रंकाळ्यासारखेच प्रति रंकाळा साकारण्यासाठी शिवपार्वती तलावासाठी १४ कोटी ९८ लाख इतका उच्चांकी निधी आणत वडणगे गावच्या विकास कामास सुरुवात केली आहे
चंद्रदीप नरके म्हणाले माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर लोक कल्याणकारी योजना राबवत असताना या राज्यातील एक लाख ६२ हजार महिला बचत गटांना २८०० कोटी अनुदान या शासनाने दिले करवीर मतदार संघातील ९३ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आमदार नसताना सुद्धा मतदारसंघातील १४५ लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्यासाठी मदत मिळवून दिली
या सभेवेळी यावेळी एकनाथ पाटील, शुभांगी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक पाटील यांनी केले. यावेळी अमर नाईक सरपंच संगीता पाटील, कृष्णा पवार, एस आर पाटील, कोमल मिसाळ, शारदा जाधव, बाजीराव पाटील, यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संपर्क संख्येने उपस्थित ह