विकासकामांव्दारे मतदारसंघाचा कायापालट करणारे चंद्रदीप नरके यांना निवडून दया – के.एस.चौगले
चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ पुनाळ पुशिर म्हाळूंगे देवठाणे कसबा ठाणे प्रचार दौरा
फक्त निवडणूकीच्या निमित्ताने मतदारसंघात फिरणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा नेहमीच मतदारसंघात संपर्क असणारे आणि विकासकामांव्दारे मतदारसंघाचा कायापालट करणारे चंद्रदीप नरके यांना करवीरची जनता बहुमताने निवडून देईल असा ठाम विश्वास भाजपचे के.एस. चौगले (आण्णा) यांनी केला.
चंद्रदीप नरके यांचे प्रचारार्थ पुनाळ येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यादरम्यान यवलूज, सातार्डे, पडळ, माजगांव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे, माजनाळ, पुनाळ, पुशिरे, म्हाळूंगे, महाडिकवाडी, कसबा ठाणे या गांवामध्ये लोकांच्या उर्त्स्फत प्रतिसादात प्रचार दौरा केला.
के.एस.चौगले म्हणाले, मोदी सरकारने महिला सबलीकरण व शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल हे समजून योजना राबविल्या. त्यांचाच आदर्श घेऊन राज्यातील महायुतीचे सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्षात राबविल्या आहेत. राज्यातील जनतेला थेट लाभ देणारे महायुतीचे सरकार आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्व घटकांना मिळण्यासाठी 24 तास राबणारा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या चंद्रदीप नरके यांना पुन्हा एकदा आमदार करुया असे के.एस. चौगले यांनी आवाहन केले.
यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की, विरोधी उमेदवाराचे कर्तुत्व काय ? आमदारांना विकास निधी मिळतो. मिळणारा विकास निधी राज्यात सर्वात कमी खर्च करणारा आमदार म्हणून काँग्रेसच्या मागील आमदाराचे नाव प्रसिद्धी माध्यमांनीच समोर आणले.आता त्यांचे वारसदार निवडनूकीत उमेदवार आहेत.तेही जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना परिते जिल्हा परिषद मतदार संघात विकासाचे एकही काम केलेले नाही.अशा अकार्यक्षम उमेदवारांना निवडून देणार का? असा सवाल चंद्रदीप नरके यांनी केला. या भागाच्या चौफेर विकासासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी अनेक योजनांमधून कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.व्यक्तीगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत.या पुढील काळातही या परिसराचा विकास गतीमान करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी दया.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले, विरोधक काँग्रेस म्हणजे लुटारूंची टोळी आहे. भोगावती कारखान्यात सत्तेचा वापर करत साखर, मोलँसिस, ताडपत्री चोरी करून नेत्यांनी घरे भरली दुसरीकडे चंद्रदीप नरके यांनी पैसा हिशेब ठेवत अडचणीच्या काळात ही शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे ऊस दर दिला आहे असे सांगितले. कष्टकरी, शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या हिताचे निर्णय घेणारे चंद्रदीप नरके यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
कोमल चौगले म्हणाल्या, शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची घराघरात ओळख आहे तर विरोधी काँग्रेसचे ओळख नसलेले वारसदार उमेदवार आहेत यावेळी पन्हाळ्यातील जनता चंद्रदीप यांच्या विजयात मोठा वाटा उचलणार आहे.
यावेळी कुंभी बँक संचालक हिंदूराव मगदूम, माजी पं.स. सदस्य रवी चौगुले, नामदेव पाटील, मारुती पाटील, प्रकाश पाटील, बी.जी. पाटील, एन. एल. चव्हाण. मदन चव्हाण, संभाजी पाटील, लाला पवार. भगवान पवार. गीता बाडे, यांचेसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, गावा गांवामधील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.
फोटो कॅपशन : – पुनाळ, ता. पन्हाळा येथील प्रचार दौऱ्यामध्ये बोलताना भाजपचे के.एस. चौगेले, मा.आ.
चंद्रदीप नरके व समोर उपस्थित जनसमुदाय