मोदींच्या स्वप्नासाठी मंडलिकांना बळ देऊया -चंद्रदीप नरके

Spread the news

मोदींच्या स्वप्नासाठी मंडलिकांना बळ देऊया -चंद्रदीप नरके

संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

यवलुज

‘ शाश्वत विकासाचे ध्येय घेऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या मोदींच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा खासदार करूया. भरघोस मतांच्या रूपाने संजय मंडलिकांना बळ देऊया.’ असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ संपर्क दौऱ्यावेळी यवलुज (ता.पन्हाळा) येथे ते बोलत होते.
नरके म्हणाले, ‘समाजातील सर्व घटकांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी गेल्या दहा वर्षात देशाचा वेगाने विकास केला. साखर कारखान्यांना आयकर विभागाने लावलेला कोट्यावधी रुपयांचा आयकर माफ केला. केंद्रातील सरकारने पंतप्रधान मोदींच्या सबका साथ सबका विकास या विचाराला चालना देताना शेतकऱ्यांसाठी प्रथमच पीएम किसान योजना राबवून त्या अंतर्गत वर्षाला दोन हजारांचे तीन हफ्ते असे एकूण सहा हजार रुपये देत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही वर्षाला सहा हजार रुपये देण्याची योजना चालू केली आहे. तसेच गरिबांना रेशनच्या माध्यमातून मोफत धान्य दिले जात आहे. खासदार मंडलिक यांनी महायुती सरकारच्या माधमातून गेल्या अडीच वर्षात या परिसरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत.
दरम्यान, मंडलिक यांच्या प्रचारासाठी पडळ, सातार्डे, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, देवठाणे या गावांमध्ये संपर्क दौरा झाला.
यावेळी कुंभी साखर कारखाना संचालक संजय बळवंत पाटील, बळवंत करचे, अनिश पाटील, राजाराम कारखाना संचालक संतोष पाटील तसेच, पांडुरंग पाटील, जयसिंग पाटील, बाजीराव रांगडे, भिवाजी कोले, अशोक बोरगे, पडळच्या सरपंच सविता प्रकाश केकलेकर, जे. बी. नांगरे, बाळासो कदम, शहाजी पाटील, रवि चौगले, आनंदराव माने, राजाराम शिंदे आणि परिसरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!