*केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्ती आणि विकसित भारताची पायाभरणी, खासदार धनंजय महाडिक*
*अभुतपूर्व आणि ऐतिहासिक केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळं नोकरदार-शेतकरी-महिला-युवा-उद्योजक अशा सर्वांचं समाधान*
खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करून, अर्थमंत्री नामदार निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करणारा आणि त्याचवेळी विकसित भारत निर्मितीला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. विशेषतः १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाल्याबद्दल खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी अशा सर्व घटकांना विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाख करण्याच्या निर्णयामुळे शेतकर्यांना या अर्थसंकल्पातून सर्वाधिक आधार मिळाला आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प असून, पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडीट सुविधांवर भर देण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. आजचा अर्थसंकल्प म्हणजे देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.