दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ ! …
सामाजिक
टोल माफीसाठी खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध
टोल माफीसाठी खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध आमदार सतेज पाटील कोल्हापूर टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत, हे त्यांनी सिद्ध केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. मी टोल नाक्याची कागदपत्रे मागणी केली असून हा टोल नाका थर्ड पार्टी, कोणाकडे चालवायला आहे. हे देखील लवकरच सिद्ध होईल असा टोलाही त्यांनी मारला. काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी, राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थाच्या मुद्द्यावरून टोल माफीसाठी आंदोलन केले होते. यावरून, खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील म्हणाले, टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत हे स्पष्ट होते. दरम्यान टोल माफी आंदोलन केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आमदार सतेज पाटील यांनी याबाबत ही तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हेच दाखल करायचे होते तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करायला हवा होता. लोकांच्या हितासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल होणार हे सरकारचे धोरण दिसत आहे. अशी टीकाही त्यांनी केली. कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवलेल्या पूरस्थितीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, पूरस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान एक दिवसांचा दौरा करायला हवा असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकी वेळी सहा दिवस मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात होते.. मात्र आपतीच्या वेळी सांगली आणि कोल्हापूरकडे त्यांनी पाठ फिरवली हे दुर्देवी असल्याचही त्यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा धरणे आंदोलन आमदार सतेज पाटील यांची माहिती
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा धरणे आंदोलन आमदार सतेज पाटील यांची माहिती कोल्हापूर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचे राज्य सरकार सांगत असताना दुसरीकडे पर्यावरण विभागाकडे या महामार्गाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविले आहे, यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शक्तिपीठ विरोधात आता रस्त्यावरील लढा आणखी तीव्र करण्याबरोबरच १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शक्ती पीठ महामार्गाला विरोध दर्शवण्याकरिता शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्ह्णाले, शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे खोट सांगून, राज्य सरकारन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळं आता, रस्त्यावरील आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वच शेतकऱ्यांनी, शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नको असलेला महामार्ग जनतेवर लादला जात असल्याने, या महामार्गातील सरकारचा लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित करत, राज्य सरकारवर टिका केली.12 तारखेला होणाऱ्या महाधरणे आंदोलनानंतर लवकरच या संदर्भात कोल्हापूर मध्ये आम्हीं राज्यव्यापी परिषद घेणारं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, सम्राट मोरे, के बी पाटील, शिवाजी कांबळे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.
महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे 2019-20 सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे 2019-20 सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* कोल्हापूर जिल्हयात जुलै २०२४ मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे २०१९-२० या…
ईपीएसची पेन्शन नऊ हजारपर्यंत वाढवा, खासदार शाहू छत्रपतींची लोकसभेत मागणी.
ईपीएसची पेन्शन नऊ हजारपर्यंत वाढवा, खासदार शाहू छत्रपतींची लोकसभेत मागणी. कोल्हापूर : ईपीएस ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्ती वेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले…
शहाळे नारळ फोडण्यासाठीच्या उपकरणासाठी* *डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीला पेटंट*
*शहाळे नारळ फोडण्यासाठीच्या उपकरणासाठी* *डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीला पेटंट* तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्री महाविद्यालयाने तयार केलेल्या “टेंडर कोकोनट पंचिंग व स्प्लिटिंग मशीन” ला…
म्हैस दूध वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन -विश्वास पाटील माजी चेअरमन गोकुळ दूध संघ हातकणंगले तालुका संपर्क सभा खेळीमेळीत पार पडली.
म्हैस दूध वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन -विश्वास पाटील माजी चेअरमन गोकुळ दूध संघ हातकणंगले तालुका संपर्क सभा खेळीमेळीत पार पडली. कोल्हापूर ता.०६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक…
शिक्षणातून समाजाची प्रगती साधणारे – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 37 वा स्मृतिदिन समारंभ दि.8 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न् होत आहे त्यानिमिताने श्री…
मनसे जिल्हाध्यक्षांवर दरोड्याचा गुन्हा, चौघांना अटक
मनसे जिल्हाध्यक्षांवर दरोड्याचा गुन्हा, चौघांना अटक
विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवाजी महाराजांचे नाव: न्यू कॉलेज, कोल्हापूर च्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता.
विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवाजी महाराजांचे नाव: न्यू कॉलेज, कोल्हापूर च्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता कोल्हापूर वनस्पतीशास्त्र विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार…