*डी वाय पाटील ग्रुपच्या ७ महाविद्यालयांमध्ये* *आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ* -युवक-युवतींना मिळणार मोफत रोजगारक्षम प्रशिक्षण कोल्हापूर: डी वाय पाटील ग्रुपमधील सात महाविद्यालयांमध्ये गुरवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…
महापालिका
याही वर्षी नवरात्रीत ‘शाही दसरा महोत्सवातून‘ विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा, सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारुन दिशादर्शक फलक लावा, पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षाविषयक नियोजन करा, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. यावेळी मंदिर परिसरातील धोकादायक इमारतींचीही पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आरोग्य पथकाबरोबर आपत्ती विषयक नियोजन करा. बचाव पथकांची नेमणूक करा. दरवेळी सारख्या प्रत्येक विभागाने आपल्याकडील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवांतर्गत विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच मागील वर्षी पासून करवीर तारा पुरस्कारही सुरु करण्यात आला आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. याही वर्षी महिलांचा जास्त सहभाग असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांध्ये ढोल, लेझीम, पारंपरिक नृत्य, कला तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे. तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम यात पारंपरिक पोशाख दिवस, शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन, करवीर तारा पुरस्कार वितरण, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक युध्द कला, ई. कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, प्रांताधिकारी हरिष धार्मिक, अति. महापालिका आयुक्त राहुल रोकडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, पोलीस उपअधिक्षक अजित टिके, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसिलदार स्वप्निल रावडे, जिल्हा पर्यटन समिती सदस्य आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील समरजीत घाटगे गटाच्या पुणेकरांचा मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश*
*कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील समरजीत घाटगे गटाच्या पुणेकरांचा मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश* *पाच वर्षापूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप* *समरजीत घाटगेंच्या कारभाराला कंटाळून ५० अधिक प्रमुखांनी सोडला गट*…
रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवूया* *महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्धार*
*रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवूया* *महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्धार* गडहिंग्लज,प्रतिनिधी. विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःचा आणि कांही ठेकेदार यांचाच विकास केला.लोकनेते स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर…
कागल ते पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी मंजूर -खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
कागल ते पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी मंजूर -खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश कोल्हापूर,ता. १९ : शेतकरी, शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय…
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या १४ संशोधकांनी स्थान
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या १४ संशोधकांनी स्थान ⁷ कोल्हापूर, : जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची सन २०२४ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच (दि. १६…
परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा, राज्याच्या राजकारणाला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेते एकत्र पुणे
‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा, राज्याच्या राजकारणाला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेते एकत्र पुणे आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू,…
कोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल यंदाच्यावर्षी लहान व मोठया मिळून 59 हजार 899 गणेश मुर्तीचे विसर्जन : दहा दिवसात 200 टन निर्माल्य जमा
कोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल यंदाच्यावर्षी लहान व मोठया मिळून 59 हजार 899 गणेश मुर्तीचे विसर्जन : दहा दिवसात 200 टन निर्माल्य जमा कोल्हापूर ता.19 :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व…
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार कोल्हापूर : भारतामध्ये 2020 साली नवे शैक्षणिक धोरण आले, देशात महाराष्ट्र राज्य नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे. एकत्रित शिक्षण पद्धतीमुळे आणि संयुक्त विद्यापीठ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार असून आता अष्टपैलू विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन व शासकीय तंत्रनिकेतन येथील रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुलांना चांगले शिक्षण मिळाले नाही तर बेरोजगारी वाढेल. महाविद्यालयात वेगवेगळी तांत्रिक उपकरणे, मॉडेल सादर करून प्रदर्शने भरवा, यासाठी सीएसआरची मदत घ्या, जगभरातून वेगवेगळे शिक्षक बोलवा, चांगले क्रीडा स्पर्धांचे आयोजन करा यातून चांगले शैक्षणिक वातावरण तयार होवून मुलांना जगाच्या पाठीवर उभे राहण्यासाठी आधुनिक शिक्षण मिळेल. या उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, सहसंचालक दत्तात्रय जाधव, उपसचिव मोहम्मद उस्मानी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
*स्मृतीदालनामध्ये शिवाजीराव सावंत यांना अभिवादन* आजरा : येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृतीदालनामध्ये सावंत यांच्या स्मृतीदिनी बुधवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक…