कोल्हापूर : दिवंगत माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या ७३व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. करवीरसह जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत लाडक्या नेत्याला अभिवादन केले. काही…
महापालिका
कोल्हापूर : एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन (एएफसी) विकास समितीवर केएसए चे अध्यक्ष आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची निवड झाली आहे. आशियाई खंडातील महासंघटनेवर काम करण्याचा असा मान प्रथमच कोल्हापूरला मिळाला…
क्रिडाई अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत, उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा
कोल्हापूर बांधकाम व्यावयसियकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत तर उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष महेश यादव व सुजय होसमनी यांच्या…
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर* *महापालिकेची यंत्रणासक्षम करून शहराचा विकास साध्य करू : आमदार राजेश क्षीरसागर* *पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शिवसेनेकडून जाहीर सत्कार*
*कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर* *महापालिकेची यंत्रणासक्षम करून शहराचा विकास साध्य करू : आमदार राजेश क्षीरसागर* *पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शिवसेनेकडून जाहीर सत्कार* कोल्हापूर दि.१५ : शिवसेनाप्रमुख…
डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ* -नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती -खासदार डॉ. श्रीमंत छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली समारंभ
*डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ* -नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती -खासदार डॉ. श्रीमंत छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली समारंभ कोल्हापूर/ शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान…
संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर* पुरस्काराचे मानकरी: मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.
कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ”एसजीयु आयकॉन” हा…
शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार २० ला होणार राज्यव्यापी बैठक विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांची माहिती*
कोल्हापूर महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता कोल्हापुरातील राजर्षि शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे अशी माहिती विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली आहे. महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्या नंतर महायुती सरकार हे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत अशा बातम्या देखील सरकार फिरवत आहे. पण कोणतेही अधिकृत पेपर सर्क्युलर, नोटिफिकेशन सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग करण्यासाठी ते खोट्या प्रचाराचा देखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की, या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे. खरे तर या विरोधात 12 पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या फेब्रुवारी 2024 पासून आंदोलन करत आहेत. याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी 24 जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन 10 जिल्ह्यांमध्ये केले. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना त्यांचे इंटेलिजन्स व पोलीस हे या सर्वांची माहिती देतात. तरीदेखील पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विपर्यास करत नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा स्टेटमेंट दिले की शक्तीपीठ महामार्गाला सर्व आमदारांनी समर्थन दिले आहे, ही गोष्ट देखील खरी नाही. शक्तीपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे, पर्यावरणाचे, करदात्यांचे, जनतेचे सर्वांचेच नुकसान होणार आहे. पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. एकीकडे कोल्हापूर यामधून वगळल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे कोल्हापूरसह आराखडा तयार आहे. यामुळे नक्की निर्णय काय याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्यातील एकजूट घडवत आरपारची लढाई करायचे ठरवले आहे. यासाठी राजर्षि शाहू महाराजांच्या भूमीमध्ये 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तेथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या व्यापक बैठकीस कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले आहे.
कोल्हापूर डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात “ऑटो रीवोल्युशन एक्सपो” उत्साहात संपन्न झाले. मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या प्रदर्शनात बैलगाडीच्या चाकापासून ते अद्ययावत दुचाकी वाहनांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात आला. डी वाय…
मुलांमध्ये चांगले विचार रुजविण्याची ताकद चांगल्या चित्रपटांत : गणेश चौगुले ‘पीपल’ने बाल चित्रपट महोत्सवास प्रारंभ : पहिल्या दिवशी १५०० विद्यार्थ्यांनी घेतला भाग
कोल्हापूर : मुलांमध्ये चांगले विचार रुजविण्याची ताकद चांगल्या चित्रपटांमध्ये आहे. या माध्यमातून लहान मुलांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याचे काम चिल्लर पार्टी करत आहे, ही चळवळ राज्यभर पोहोचण्याची गरज आहे, असे…
कोल्हापूर : माजी खासदार रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष वस्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केला . संभाजीराजे परदेशात असल्याने त्यांच्याशी उपस्थितांनी ऑनलाईन संवाद…