भाजपा जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे उत्साही स्वागत*

Spread the news

*भाजपा जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे उत्साही स्वागत*

  1. U­

 


कोल्हापूर दिनांक 6
राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर असता त्यांनी भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी दिल्या.
भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

  •  

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, सर्वप्रथम आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात केलेल्या या स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानले.
महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रचंड यशामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी देखील वाढली आहे लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा बूथ अध्यक्ष ते भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी कायमच सक्रिय असतो.
प्रत्येक कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आव्हान त्यांनी केले. जानेवारी महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व सुरू झाले आहे या अंतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी तसेच बूथ समिती, जिल्हा समिती इत्यादी पूर्ततेसाठी असेच अखंडपणे कार्यरत राहावे असेही आव्हान केले. तसेच जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या संघटन पर्वानिमित्य हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून अनेक संघटनांची निवेदने स्वीकारली.
खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, प्रदेश सचिव महेश जाधव, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!