भोगावती शिक्षण मंडळामध्ये काँग्रेसच्या राहुल पाटील पॅनेलचा दणदणीत विजय… अरुण डोंगळे, संपतराव पवार आघाडीच्या विजयाचे शिल्पकार १२ जागांवर शाहू पॅनेल विजय :

Spread the news

भोगावती शिक्षण मंडळामध्ये काँग्रेसच्या राहुल पाटील पॅनेलचा दणदणीत विजय…

अरुण डोंगळे, संपतराव पवार आघाडीच्या विजयाचे शिल्पकार

१२ जागांवर शाहू पॅनेल विजय :

विरोधी शिवशाही आघाडीला एकमेव जागा

 

कोल्हापूर : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार संपतराव पवार, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे,जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ राजर्षि शाहू शिक्षण सेवा आघाडीने १३ पैकी १२ जागांवर दणदणीत विजयी मिळवत मिळवले विरोधी दादासाहेब पाटील कौलकर शिवशाही आघाडीला केवळ एकमेव जागा मिळाली.

 

  1. शिक्षण मंडळाच्या तेरा जागांसाठी सत्तारुढ शाहू सेवा आघाडी व दादासाहेब पाटील-कौलवकर शिव शाहू आघाडी यांच्यात सरळ लढत झाली. मंडळाच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सत्ताधारी गटाच्या बारा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. विरोधी गटाचे संजय कलिकते हे एकमेव उमेदवार विजयी झाले. एकनाथ वरुटे यांचा पराभव झाला.8

पहाटे निकाल लागल्यानंतर सत्तारुढ गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण भुईबर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांनी काम पाहिले.
विधानसभा निवडणुकी त पराभव झाल्यानंतर राहुल पाटील यांनी या निवडणुकीत आपले कौशल्य पणाला लावत अनेक जोडण्या केल्या आमदार सतीश पाटील यांची त्यांना मदत मिळाली गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनीच भोगावती शिक्षण संस्थेवर आपला झेंडा फडकवला.

 

शाहू शिक्षण सेवा आघाडीचे विजय उमेदवार

  1. राजेंद्र आडके 11303
    बाजीराव चौगुले11835 बाजीराव लहू चौगुले11510 अभिषेक डोंगरे11642
    समरसिंह पवार 11463
    प्रमोद पाटील11615
    मोहन पाटील 11865
    राजाराम पाटील11342
    रोहित पाटील11480 सुभाष पाटील11750 शिवाजी भाट11872दिगंबर मेडशिंगे10125

Spread the news

You may also like

error: Content is protected !!