भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना हाच सर्वोच्च कायदा – नामदार चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर दि. २७ भारतीय जनता पार्टीच्या वतीने २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी, ‘संविधान गौरव अभियानांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमित गोरखे, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापुरुषांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले.
आमदार अमित गोरखे बोलताना म्हणाले, भाजपाने नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय घटनेचा सन्मान केला आहे. याउलट काँग्रेसने वारंवार डॉ. आंबेडकरांना अपमानित केले आहे. काँग्रेसने त्यांचा दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे. यामुळे संविधानाला धोका कोणापासून आहे ? हे लोकांना पटवून द्या असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटनेची माहिती प्रत्येक सर्वसामान्य माणसांना समजावून सांगा. डॉ आंबेडकर हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्याचबरोबर ‘काँग्रेस व नेहरु घराण्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला. याउलट भाजप सरकारच्या कालावधीत त्यांना भारतरत्न किताब दिला. संविधान जपण्याचे काम भाजपने केले. डॉ आंबेडकरांचे जीवनकार्य साऱ्यांना प्रेरक आहे. खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तुंग झेप घेतली आहे.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कायमस्वरूपी संविधानाचा गौरव व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये संविधान गौरव अभियान राबवले जात आहे. हे अभियान म्हणजे महापुरुषांचे आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे आणि देश व संविधानाप्रती असलेल्या कर्तव्याबाबत जनजागृती व्हावी, हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवरच देश चालतो. घटना हाच सर्वोच्च कायदा आहे. त्यामध्ये अधिकार व कर्तव्याचा मूळ गाभा आहे. समता, बंधुता, मताचा सर्वांना समान अधिकार ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. घटना कोणीही बदलू शकत नाही. पुढील एक हजार वर्षे तरी ते कोणाला शक्य नाही. पण कॉंग्रेस सत्तेत असताना संविधानामध्ये ७५ पेक्षा अधिक दुरुस्ती करण्यात आली याचा कोणताही फायदा सर्वसामान्य जनतेला झाला नाही. त्याचबरोबर भाजपाच्यावतीने अटलजींच्या काळात संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली ती म्हणजे शिक्षण सर्वांना मोफत व सक्तीचे झाले पाहिजे. मोदिजींच्या काळामध्ये EWS अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या समाजाला १० % आरक्षण मिळावे यासाठी संविधानाच उपयोग करण्यात आला. तसेच भाजपाने ज्या – ज्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती स्थळे आहेत त्यांना तीर्थ स्थळे घोषित करण्याचे काम केले आहे. संविधान हा प्रत्येकाचा स्थायीभावी बनला पाहिजे. घरोघरी संविधानाचा जागर झाला पाहिजे असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
त्याचबरोबर भाजपा कोल्हापूरच्या वतीने संविधान गौरव अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाजपा सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन व आभार अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल कामत यांनी केले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राहुल चिकोडे, संजय पाटील, डॉ राजवर्धन, अनिल कामत, महेश चौगले, गायत्री राऊत, रुपाराणी निकम ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.