हॉटेल पर्लमध्ये बार्बेक्यू बिर्याणी आणि कबाब फेस्टिव्हल
वीस पेक्षा अधिक बिर्याणीच्या रवीचा घेता येणार आनंद
कोल्हापूर,:
कोल्हापूरकरच नव्हे तर सर्वांनाच बिर्याणीच्या चवीबाबत अधिक उत्सुकता आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. बिर्याणी हा एक असा पदार्थ आहे ज्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. बिर्याणीच्या अनेक भिन्त्र, विशिष्ट शैली विकसित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल पर्लमध्ये बार्बेक्यू बिर्याणी आणि कबाब फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत रोज संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत हा फूड फेस्टिव्हल सुरू राहणार असल्याची माहिती हॉटेल पर्लचे विजय घाटगे यांनी दिली.
दरम्यान, या फेस्टिव्हल दरम्यान खवय्यांच्या बाटील, जिभेला आणि मनालाही तृप्त करण्यासाठी पनीर हिलटॉप कबाब, विजय मशरूम पनीर शास्लीक, मूर्ग चिंगारी कबाब, मूर्ग तंगडी कुल्फी, मटण तंदुरी चॉप या मधील नावीन्यपूर्ण पदार्थांसोबत मूर्ग शिकारी दम बिर्याणी, शाही व्हेज यासह वीस पेक्षा अधिक बिर्याणीचा आनंद घेता येणार आहे.
व्यवस्थापक बाळासाहेब खपले अनेक म्हणाले, “हॉटेल पर्ल कोल्हापूरच्या खाद्य परंपरेतील नावाजलेले हॉटेल आहे. बिर्याणी आणि कबाब करण्याच्या तंत्राबरोबरच मसाले आणि आमच्या शेफच्या अनुभवातून वेगवेगळ्या माने, डिशेशचा अनुभव शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारात घेता येणार आहे.
यावेळी व्यवस्थापक इंतकाब अस्लम, चिअर्स रेस्टॉरन्ट व्यवस्थापक चैतन्य देशपांडे, वसंत शिंदे, जयदीप दान, शिवाजी व्हरांडेकर, प्रमोद बोडके, आनंद पाटील आदी उपस्थित होते.