बारा वर्षात मुश्रीफांनी फाईव्ह स्टार एमआयडीसीत एकही उद्योग आणला नाही : समरजीतसिंह घाटगे : बाळेघोल येथे जाहीर सभा

Spread the news

बारा वर्षात मुश्रीफांनी
फाईव्ह स्टार एमआयडीसीत
एकही उद्योग आणला नाही
: समरजीतसिंह घाटगे
: बाळेघोल येथे जाहीर सभा

सेनापती कापशी/ प्रतिनिधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात उद्योगधंदे आणले नाहीत. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा वर्षात एकही मोठा उद्योग त्यांना आणता आला नाही. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बाळेघोल (ता.कागल) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,” ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता दिली. मात्र त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून एक पिढी बरबाद केली. सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला याचा महिलांनी विचार करावा.”
पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले,” स्वतःच्या स्वार्थासाठी समाजास वेठीस धरण्याचे काम सुरू आहे.
भय आणि भ्रष्टाचार मुक्त समाज जीवनासाठी मुश्रीफांना पराभूत करणे आवश्यक आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या वाईट, चुकीच्या प्रवृत्तीचा नायनाट या निवडणुकीत त्यांना पराभूत करून करूया. मुश्रीफांकडून तुमच्या स्वातंत्र्याला लोकशाहीला धक्का दिला जात आहे. या निवडणुकीत मुश्रीफ तुम्हाला चंद्र आणि सूर्य सोडून सर्व काही देतील. पण त्यांच्या आमिषाला बळी न पडता लोकशाहीचा खरा हिसका त्यांना दाखवूया.”
शिवाजीराव कांबळे म्हणाले, ” ईडीच्या भितीने पालकमंत्री हसन मुश्रीफांनी पुरोगामीत्वाला तिलांजली दिली आहे.”
स्वागत व प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले. सभेस शिवाजी कांबळे, मनजीत बेनाडीकर,दयानंद पाटील नंद्याळकर, चित्रा गुरव, मोहन मोरे,संजय बरकाळे उपस्थित होते.‌ आभार दिनकर गुरव यांनी मानले.‌

चौकट- मुश्रीफांना जनता कंटाळल्याने परिवर्तन अटळ
गेल्या पंचवीस वर्षांत होत असलेली दडपशाही,हुकुमशाहीला जनता कंटाळल्याने गावागावात परिवर्तनाचे वारे घोंघावत आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याने या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. मुश्रीफांनी माणसांच्या विचारधारेला तिलांजली दिली. अशा नेतृत्वाला बदलण्याची वेळ आली आहे. पैसे पेरूण तरुणाई व्यसनाधीन केले. पालकमंत्र्यांनी संपत्तीच्या धुंदीत अनेक घरं फोडली. असे प्रतिपादन सागर कोंडेकर यांनी केले.

फोटो ओळ- बाळेघोल: महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे बाळेघोल येथील जाहीर सभेत बोलतांना.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!