जागतिक स्पर्धेसाठी बँकांनी तयार रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Spread the news

­

जागतिक स्पर्धेसाठी बँकांनी तयार रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सहकार चळवळ रुजवली .त्यांच्या योगदानामुळेच तत्कालीन कालखंडात सुमारे 37 सहकारी संस्था उभ्या राहिल्या .कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1938 सालची असून विद्यमान संचालकांच्या सचोटीमुळे सध्या ही बँक सुस्थितीत आहे .तथापि यात समाधान न मानता जागतिक स्पर्धेसाठी या बँकेसह राज्यातील इतर बँकांनी तयार राहावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
.यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ , खा धनंजय महाडिक , खा . धैर्यशील माने बँकेचे उपाध्यक्ष आ .राजू आवळे,आ . राजेंद्र पाटील यड्रावकर ,आ . राजेश पाटील माजी खासदार निवेदिता माने , माजी आ.संजय घाडगे, माजी आ .अमोल महाडिक आदी उपस्थित होते .
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत व इ – लॉबीचे उद्घाटन श्री पवार यांच्या हस्ते झाले . ते पुढे म्हणाले, येथील शेतकरी कष्टाळू आहे .बँकेमार्फत घेतलेले कर्ज तो वेळेत फेडतो .ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणजे ही बँक असून इ लॉबी सुविधा सुरू करणारी ही राज्यातील पहिली बँक असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले तसेच सहकार व राज्यातील बँकांचे प्रश्न केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या मदतीने सोडवणार असल्याचे सांगून आत्तापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिल्याचे सांगितले .
बँकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हयात 191 शाखा सुरू असून आत्तापर्यंत सुमारे 204 कोटीचा ढोबळ नफा या बँकेला झाला आहे .जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना या बँकेने सढळ हाताने कर्जपुरवठा केला आहे .आतापर्यंत सातत्याने अ वर्ग मिळवला असून नोटबंदी कालावधीतील सुमारे 25 कोटी रक्कम पुन्हा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . तर या बँकेत सुमारे 9500 कोटी रुपयांच्या ठेवी असून सध्या बँक सुस्थितीत असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजू आवळे यांनी दिली .
सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून नवीन पाच मजली इमारत बांधली असून धनादेशाच्या वठणावळीसाठी अगदी सुट्टीच्या दिवशीही बँक सुरू राहणार आहे .या नवीन इमारतीमध्ये अकाउंट , एटीएम ,क्लिअरिंग , गुंतवणूक , साखर कारखाना तसेच व्यक्तिगत कर्ज पुरवठा ,गुंतवणूक आदी विभाग या नवीन इमारतीमध्ये कार्यरत राहणार आहेत .इ – लॉबी सुविधेमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा – सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत . यावेळी या इमारतीचे आर्किटेक्चर ,इंजिनियर , सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर , फर्निचर फिक्चर कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी बँकेच्या संचालकासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

00000


Spread the news

You may also like

error: Content is protected !!