भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेवरून घालवा
बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
राहुल पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन
कोथळी येथील जाहीर सभेत आवाहन
देवाळे
महाराष्ट्र ही संतांची शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांची भूमी आहे मात्र भाजप व महायुती राज्यात फसवा फसवी करून पुरोगामी महाराष्ट्राला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत .50 खोके देऊन सत्ता स्थापन केली जात असून 70 हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी का थांबवली याचे उत्तर द्यायला तयार नाहीत .या सरकारला केवळ सत्ता लाडकी असून राज्यात महागाईचा आगडोंब झाला असून ह्या भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेवरून घालवा अशी टीका काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केली.करवीर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांना महाराष्ट्रात उच्चांकी मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले .
कोथळी ता करवीर येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते .सभेच्या अध्यक्षस्थानी शेका पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील हे होते .या व्यासपीठावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचीही उपस्थिती होती .
आपल्या भाषणात पुढे बोलताना थोरात यांनी पी एन पाटील महाराष्ट्रातील एक निष्ठावंत नेते होते काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी .केले होते .राहुल पाटील यांच्याकडे विकासाची दृष्टी असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून पी एन पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले .महाराष्ट्रात महायुती व भाजपचा फसवा फसवी चा खेळ सुरू असून जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहेत .लोकसभेला मोदी व भाजपचा अहंकार मोडण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले असून पुरोगामी महाराष्ट्रात समतेचा विचार बदलण्याचा प्रकार जनता अजिबात मान्य करणार नाही .या सरकारला बहीण लाडकी नाही तर सत्ता लाडकी असल्यामुळे लाडकी बहीण योजना राबवली आहे .त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीला पराभुत करा व महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करा.असे टीकास्त्र काँग्रेसचे नेते आ बाळासाहेब थोरात यांनी सोडले .
.महाराष्ट्र भूमी ही संतांसह फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे या ठिकाणी पुरोगामी विचार रुजलेले आहेत .काँग्रेसचे विचार हे पुरोगामी आणि शाश्वत आहेत .महाराष्ट्राची भूमी समतेचा विचार कधीही बदलू देणार नाही .आतापर्यंत काँग्रेसने ज्या ज्या योजना राबवल्या त्याच योजना नाव बदलून भाजप राबवत असून पंतप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलण्याऐवजी जाती धर्मात भेद निर्माण करत आहेत .भाजप व महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना राबवली असून .त्यांना बहीण लाडकी नाही तर सत्ता लाडकी आहे .भाजपला मत देणे म्हणजे पुरोगामी विचाराशी प्रतारणा असल्याने सांगून विकासासाठी महाविकास आघाडीला विधानसभेत सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी या देशातील जनतेला न्यायही मिळत नाही .निवडणूक आली तरी आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागलेला नाही .महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज शाहू राजे आंबेडकर फुले यांचे संस्कार आहेत .नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खेळ खंडोबा केला आहे महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे राज्य असून महायुती व भाजप नेत्यानी वाटोळे केले आहे . नको त्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राचे अब्रू घालवली आहे .ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे तसेच करवीर चे अस्मितेचे ही लढाई आहे संविधान बुडवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेवरून हाकला व करवीर मतदार संघातून राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधी यांनी लोकसभेच्या निवडणूकी त लोकांनी संविधान वाचवण्या साठी कौल दिला आहे अजूनही संविधान सुरक्षित नाही संविधान कमजोर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संविधानाचा रंग नाही तर आशय महत्वाचा आहे त्यामुळे महाराष्ट्रात संविधान कमजोर करणाऱ्यांना थारा देऊ नका असे सांगून राहुल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करून स्वर्गिय पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहावी असे सांगितले .
यावेळी बोलताना उमेदवार राहुल पाटील यांनी स्वर्गिय पी एन पाटील यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरात यांनी मोठा आधार दिला . ज्या प्रमाणे आपण साहेबांना पाठबळ दिले होते तसेच पाठबळ मला दया तुमच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्चित असून सर्वांसमोर नतमस्तक होऊन तुमचा सेवक म्हणून आजन्म सेवा करेन असे सांगितले .
यावेळी भोगावती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील शिवसेनेचे भरत आमते गगनबावड्या चे माजी सभापती बंकट थोडगे किरण पाटील रिपब्लिकन पक्षाचे निवास सडोलीकर शिवसेनेचे रणधिर पाटील कुंभी परीसर शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळेकर यांची भाषणे झाली .
यावेळी व्यासपिठावर आ जयंत आसगावकर जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर शिवसेना नेते बाजीराव पाटील भरत आमते गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील बाळासाहेब खाडे भोगावतीचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील
शे का पक्षाचे नेते क्रांतिसिंह पवार पाटील केरबा भाऊ पाटील अक्षय पवार पाटील अमित कांबळे भोगावतीचे माजी उपाध्यक्ष एम आर पाटील विश्वनाथ पाटील कुरुकलीकर उदयानी देवी साळुंखे बी एच पाटील संभाजीराव पाटील राजेंद्र सुर्यवंशी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग कांबळे सौ शुभांगी पोवार भोगावती कारखान्याचे आजी माजी संचालक यांच्यासहकरवीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते .आभार शरद पाटील यांनी मांडले .
फोटो
कोथळी ता करवीर येथेमहाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांच्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात व्यासपीठावर संपतराव पवार पाटील तुषार गांधी राहुल पाटील आ जयंत आसगावकरराजेश पाटील सडोलीकर व मान्यवर