बाईक वरून करणार अकरा हजार कि.मी. चा प्रवास
महिला सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी संयुक्ता जाधव यांचा उपक्रम
कोल्हापूर
‘प्रवास एकट्या नारीचा, होऊ दे सुखाचा’ असा नारा देत कोल्हापूरच्या क्रीडापटू संयुक्ता जाधव या तब्बल अकरा हजार किलोमीटर बाईक वरून प्रवास करणार आहेत. महिला सुरक्षिततेचा हा संदेश देण्यासाठी त्यांनी या उपक्रमांचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू म्हणून नामांकित असलेल्या संयुक्त जाधव यांनी यापूर्वी लेह, कारगिल यासह अनेक भागात बाईकवरून दौरा केला आहे. आता त्या कोल्हापूर ते काश्मीर, कलकत्ता, आणि कन्याकुमारीपर्यंत बाईक वरून भारत भ्रमंती करणार आहेत.
कोल्हापुरातून एकटी महिला इतक्या मोठ्या प्रवासासाठी निघणार आहे. 45 दिवसाचा हा दौरा असून रोज तीनशे ते चारशे किलोमीटर त्या प्रवास करणार आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना संयुक्त जाधव यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि भारतात आता महिला सुरक्षित नाही. पण महिला काय करू शकते हे दाखवून देण्यासाठी आपण हा उपक्रम राबवणार आहोत. 11 हजार किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत आणि महिला सुरक्षिततेचा संदेश देणार आहोत.
या मोहिमेची सुरुवात शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता शाहूपुरी जिमखाना येथून होणार आहे.