अयोध्या डेव्हलपर्स तर्फे ताराराणी चौकातील फुटपाथचे सुशोभीकरण
अयोध्या डेव्हलपर्सचे व्ही.बी. पाटील यांनी ‘स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर’ या योजने अंतर्गत ताराराणी चौकातील घरफाळा विभागाच्या समोरील फूटपाथ परिसराचे सुशोभीकरणाचे काम स्वखर्चाने पूर्ण केले असून त्याचे औपचारिक उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मा. के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते आज रोजी पार पडले.
मुख्य रस्त्यालगतचा हा 4000 चौरस फुटाचा परिसर स्वच्छ आणि सुशोभीकरण करून पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. कोल्हापूरचा मुख्य प्रवेशद्वार असलेला हा परिसर अनेक वर्षे दुर्लक्षित होता. येथील झाडांच्या सावलीमुळे भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली होती व अत्यंत गलिच्छ अशा या परिसरामुळे प्रवाशी बस मधून व लक्झरी बस मधून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा उपद्रव होत होता. आता या ठिकाणी 150 फूट लांबीचा ग्रॅनाईट टाईल्सचा कट्टा तयार करण्यात आला असून प्रवाशांची बैठकीची सोय झाली आहे. या कार्यक्रमाला व्ही. बी. पाटील व सिटी इंजिनियर नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.