आवळे पिता पुत्रांनी केले शाहू छत्रपतींचे अभिनंदन विजयासाठी दिल्या शुभेच्छा

शाहू महाराजांच्या प्रचारात उतरण्याची दिली ग्वाही

Spread the news

आवळे पिता पुत्रांनी केले शाहू छत्रपतींचे अभिनंदन

विजयासाठी दिल्या शुभेच्छा


कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती यांना इंडिया इंडिया व महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर हातकणंगले विधानसभेचे आमदार राजूबाबा आवळे आणि माजी समाज कल्याण मंत्री, माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी महाराजांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यांना विजयासाठी शुभेच्छा देतानाच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपले सर्व कार्यकर्ते ताकदीने प्रचार करतील अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना आमदार आवळे म्हणाले , शाहू महाराजांना काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. कोल्हापूरची जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, मी आणि आमदार राजू कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी उतरणार असून महाराजांना निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातील. शाहू महाराज हे जनतेच्या मनातील उमेदवार असून ते बहुमताने विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!