अमल महाडिक यांच्या मागणीनुसार दूधगंगा डावा कालवा प्रकल्पाच्या कामांसाठी १७६ कोटींचे अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश*

Spread the news

*अमल महाडिक यांच्या मागणीनुसार दूधगंगा डावा कालवा प्रकल्पाच्या कामांसाठी १७६ कोटींचे अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश*

कोल्हापूर

कोल्हापुरातील दुधगंगा डावा कालवा येथील कामांस प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. आता सदर कामाबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबद्दल अमल महाडिक यांनी समाधान व्यक्त केले.

दुधगंगा डावा कालवा कि. मी. १ ते कि.मी. १५ मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण व बांधकामे दुरूस्ती करणेसाठी ५५ कोटी ७९ लाख रुपये. तसेच दुधगंगा डावा कालवा कि.मी. ४७ ते कि.मी. ७६ मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण करणे यासाठी १२० कोटींच्या निधीची मागणी अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही सुरू करण्याचे तात्काळ आदेश मा.उपमुख्यमंत्र्यानी दिले होते, त्यानुसार कार्यवाहीस सुरुवात झालेली आहे.

नुकतेच राज्याचे अवर सचिव यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे याना सदर मागणीवर कार्यवाही करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १२० कोटींच्या मागणीचा प्रस्तावही शासनास सादर झालेला आहे. उर्वरित कामाचा अहवालही लवकरच शासनास सादर होईल, असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

त्यासोबतच सन २००१ साली दुधगंगा कालवे क्रमांक १ च्या किमी.३२ ते ७६ मधील माती काम अस्तरीकरण व बांधकामे या कामासाठी १२२ कोटी रुपयांची निविदा मे.पी.व्ही.व्यंकरेड्डी व मे.अविनाश कंस्ट्रक्शन यांना मंजूर करण्यात आली होती. सदर निविदेतील कामापैकी अद्याप ३० ते ४० टक्के काम अपूर्ण असताना मार्च २०२४ पासून सदरचे काम बंद आहे. त्यामुळे ते काम पूर्ण करण्यासाठीचे आदेश संबंधितांना व्हावेत, अशी विनंतीही अमल महाडिक यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

 

शासनाला अहवाल सादर झाल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहू. अस्तरीकरण व बांधकाम दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या काँक्रीटीकरणामुळे कालव्या अंतर्गत जमिनीमध्ये मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी जलदगतीने शेती क्षेत्रापर्यंत पोचण्यास मदत होईल. विशेषता दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चुये, कावणे, निगवे, इस्पुर्ली, वडकशिवाले, नागाव, दिंडनेर्ली, नंदगाव, दऱ्याचे वडगाव इत्यादी गावांतील शेतीसाठी याची मदत होईल. – मा.आ.अमल महाडिक.)


Spread the news

You may also like

error: Content is protected !!