*बस्तवडेचा सुपुत्र ‘हर्षवर्धन’ची अभिमानास्पद कामगिरी..!*
****************
*भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून रुजू*
******************
*वयाच्या 21 व्या वर्षी वेधक कर्तृत्वाने दिला घरच्या व गावच्या लष्करी परंपरेला उजाळा.!*
*****************
*हर्षवर्धनला मिळाला दीक्षांत सोहळ्यात तिरंग्याचा मान.!*
******************
बस्तवडे गावचे सुपुत्र व सध्या पाचगाव येथे राहत असलेले श्री. शैलेश मोहन भोसले व सौ.सीमा शैलेश भोसले यांचा कर्तृत्ववान सुपुत्र म्हणजे हर्षवर्धन.! चार वर्षांपूर्वी तो देशातील 8 लाख उमेदवारांमधून 107 व्या क्रमांकाने एनडीए येथे दाखल झाला होता.त्यावेळी खडकवासला येथील प्रशिक्षणात त्याने राष्ट्रपतींच्या हस्ते बेस्ट कॅडेट म्हणून ब्रॉंझ पदक पटकावले होते.त्यानंतर केरळ येथील नौदलाच्या प्रशिक्षणानंतर तो बीटेक व सब लेफ्टनंट बनला आहे.या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे चेअरमन के.राधाकृष्णन हे उपस्थित होते.कॅप्टन स्व. तुकाराम भोसले,खगोल शास्त्रज्ञ स्व. आर.व्ही.भोसले,एअर मार्शल श्री.अजितसिंह भोसले,विशेष लेखापरीक्षक स्व. मोहनराव भोसले अशा घरच्या लष्करी व विद्वत्त परंपरेला व गावच्या लष्करी परंपरेला हर्षवर्धन ने उजाळा दिला आहे..हा परिवार जरी नोकरी निमित्त पाचगाव येथे पूर्वीपासून राहत असला तरी,गाव,माता अंबाबाई यांच्याशी त्यांचे दृढ ऋणानुबंध आहेत.जिथे संधी मिळेल तिथे ते आपल्या बस्तवडे गावचा उल्लेख करीत असतात.एनडीए मध्ये दाखल झाल्यावर तसेच एनडीए प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर देखील मेडल मिळाल्यावर ते घेऊन हर्षवर्धन त्याच्या परिवारासह अंबाबाई चरणी आला होता.जर या क्षेत्रात कोणाला काही मार्गदर्शन हवे असेल तर ते जरूर देऊ असेही त्यावेळी मंदिरातील छोटयाशा मनोगतात त्याने सांगितले होते.