विद्यार्थी दशेपासूनच हस्तकलेच्या वस्तू बनवण्यास शिकावे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांचे आवाहन

Spread the news

 

विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, विद्यार्थी दशेपासूनच हस्तकलेच्या वस्तू बनवण्यास शिकावे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांचे आवाहन

गेल्या काही वर्षात पाश्‍चात्य संस्कृतीचे आकर्षण आणि आक्रमण वाढते. पण भारतीय संस्कृती आणि संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत. सणासुदीच्या निमित्ताने सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच विविध कलागुणांना चालना मिळते. आकाश कंदिल बनवणे हा वेगळाच आनंद अनुभवा, असे आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. कोल्हापूर हायस्कूलमध्ये झालेल्या आकाश कंदिल निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
भागीरथी संस्थेच्या माध्यमातून सौ. अरूंधती महाडिक यांनी हजारो महिलांचे सक्षमीकरण केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, वरूणतिर्थवेश इथल्या कोल्हापूर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदिल निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक विवेक हिरेमठ यांच्या हस्ते सौ. अरूंधती महाडिक, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे, रोटेरियन बी एस शिंपुकडे, सुहास प्रभावळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सागर बगाडे यांनी, आपल्या आजवरच्या वाटचालीत महाडिक परिवाराने दिलेले पाठबळ महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
भारतीय सण-उत्सवाला वैज्ञानिक आधार आहे. शिवाय त्यातून विविध कलागुणांना चालना मिळते. दिवाळीच्या निमित्तानं आकाश कंदिल बनवणे, हा वेगळाच आनंद घ्यायला शिका, असे आवाहन अरूंधती महाडिक यांनी केले. दरम्यान, कलाशिक्षक सुहास प्रभावळे यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण दिले. शिवाय विद्यार्थ्यांकडून अत्यंत सुंदर सुबक आकाश कंदिल बनवून घेतले. त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रंगराव जोंजाळ, जिमखाना प्रमुख एस एल गडकरी, प्रिती मुरगुडे, पूजा हुद्दार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!