अनुराधा तेंडुलकर यांचे निधन*
कोल्हापूर येथील सारस्वत विकास मंडळाच्या माजी अध्यक्षा, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा अनिल तेंडुलकर वय ६९ यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
पती अनिल तेंडुलकर यांचे निधन झाल्यानंतर अनुराधाताईंनी केदार स्प्रिंग्ज कारखान्याची दहा वर्षे जबाबदारी सांभाळली. नऊ वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाच निदान झाले. त्यातून अतिशय दृढतेने त्या बाहेरही पडल्या. बुधवारी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तितिक्षा नगरकर पुणे आणि आकांक्षा कुलकर्णी ठाणे या दोन मुली, दीर जयंतराव तेंडुलकर, प्रकाश तेंडुलकर, सुहास तेंडुलकर हे दीर यांच्यासह मोठा परिवार आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता सारस्वत भवन दसरा चौक येथे तेंडुलकर परिवार, सारस्वत बोर्डिंग, सारस्वत विकास मंडळ यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आला आहे.