जनता दलाचा श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा : मालोजीराजे, ए.वाय. यांच्या उपस्थितीत वसंतराव पाटील, खोराटे यांची घोषणा

Spread the news

जनता दलाचा श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा

: मालोजीराजे, ए.वाय. यांच्या उपस्थितीत वसंतराव पाटील यांची घोषणा

राधानगरी, प्रतिनिधी.

शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आणि स्वाभिमान आहे, त्यामुळे देशात जरी जनता दल भाजपसोबत असला तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमचा पाठिंबा मात्र शाहू महाराज यांनाच असल्याची घोषणा जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील आणि ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे राटे यांनी आज केली.

कोल्हापूर जिल्हा जनता दलाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आज माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व ए. वाय. पाटील यांच्यासह महाविकास आघाडीशी संबंधित अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

सरवडे (ता. राधानगरी) येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज सायंकाळी उशिरा मेळावा झाला. त्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन समाजवादी नेते कै. शिवाजीराव खोराटे व माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील यांच्या वैचारिक अधिष्ठानास अनुसरून हा निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील व जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे यांनी सांगितले. देशात भाजप बरोबर केलेली युती नसल्याचे सांगून हा पक्ष फसवणारा असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.

प्रा आनंदराव कवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीमंत शाहू महाराज आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून या भागाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल असे ग्वाही मालोजीराजे यांनी यावेळी दिली.
यावेळी जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत साळोखे, शौकत कलोट, प्रा. एरुडकर, दत्तात्रय धनगर, लहू गुरव, बंडा पाटील, दत्ता ढोकरे आनंदराव वरुटे आदींसह गोकुळ दूध संघाचे संचालक आर के मोरे व अभिजीत तायशेटे, माजी संचालक पी डी धुंदरे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक सुशील पाटील कौलवकर आदी उपस्थित होते. एड. शिवराज खोराटे यांनी आभार मानले.
………………


Spread the news

You may also like

error: Content is protected !!