आवाडे बँकेचा मिश्रव्यवसाय 5000 कोटी वर येणार स्वप्निल आवाडे यांची घोषणा

Spread the news

 

 

आवाडे बँकेचा मिश्रव्यवसाय 5000 कोटी वर येणार

स्वप्निल आवाडे यांची घोषणा

कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य बँकेचा मिश्र व्यवसाय ४२५० कोटीचा आहे. तो मार्च २०२५ अखेर ५ हजार कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी गुरुवारी सांगितले.
या बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, बँकेच्या आजवरच्या कारकिर्दीत विक्रमी असा ५४ कोटी रुपयांचा नफा मिळवलेला आहे. विविध समाजाच्या महामंडळाच्या योजनांचा सर्वाधिक लाभ याच बँकेने दिला आहे. आगामी काळामध्ये नेट बँकिंग सुरू करण्याचा नियोजन केले आहे.
स्वयंप्रकाश सौर प्रकल्प
बँकेच्या वतीने घरगुती वीज वापरासाठी स्वयंप्रकाश सौर प्रकल्प योजना राबवण्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले, याकरिता ग्राहकांनी ५ टक्के व्याज भरायचे आहे. ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मासिक विजेच्या बिलाइतकीच रक्कम हप्त्यापोटी भरली तरी ७ वर्षांमध्ये कर्ज फिटते.
या बँकेच्या प्रयत्नामुळे सर्व प्रकारचे आधुनिक बँक माग इचलकरंजी मध्ये येऊ शकले, असा उल्लेख करून बँकेचे मार्गदर्शक आमदार प्रकाश आवाडे यांनी
बँकेने व्यावसायिक धोरण असताना ग्राहकाभिमुख कर्ज प्रकरणे हाताळण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह माजी अध्यक्ष, संचालक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष संजय कुमार अनिगोळ यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!