इचलकरंजीत राहूल आवाडे मैदानात प्रकाश आवाडेंची घोषणा

Spread the news

इचलकरंजीत राहूल आवाडे मैदानात

प्रकाश आवाडेंची घोषणा

 

कोल्हापूर

इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून आपण मैदानात उतरणार नसल्याचे सांगतानाच राहूल आवाडे हेच उमेदवार असतील अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. आवाडे हे भाजपचे सहयोगी आहेत. पक्षाने उमेदवार दिली नाही तर ताराराणी आघाडी पक्षाच्या वतीने लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार आवाडे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून आम्ही भाजपचे काम करत आहोत. लोकसभा निवडणुकीत आमच्या  गटाने अतिशय चांगले काम केले. यामुळे महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे. यामुळे आम्हाला उमेदवारी मिळावी ही अपेक्षा आहे. यंदा माझ्याऐवजी राहूल आवाडे हेच मैदानात उतरणार आहेत. त्यांनी जोरदार तयारी केली आहे. यामुळे ते लढणार आणि दणदणीत मताने निवडूनही येणार असेही त्यांनी सांगितले.

आवाडे यांनी सांगितले की, आम्ही तिकीट मागण्यासाठी कोणाच्याही दारात जाणार नाही. सन्माने उमेदवारी दिली तरच घेणार. अन्यथा ताराराणी आघाडी पक्षाच्या वतीने इचलकरंजीसह शिरोळ आणि हातकणंगले हे मतदारसंघही लढवले जातील. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यापैकी जे तिकीट देतील, त्या पक्षातर्फे लढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!