शाश्वत परिषदेमधील घोषणा जिल्ह्याच्या विकासात्मक उपक्रमासाठी ऐतिहासिक पाऊल ठरेल* – सुरेन्द्र जैन

Spread the news

शाश्वत परिषदेमधील घोषणा जिल्ह्याच्या विकासात्मक उपक्रमासाठी ऐतिहासिक पाऊल ठरेल* – सुरेन्द्र जैन”
—————————–
कोल्हापूर : राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन [ मित्र ] व महाराष्ट्र शासन मार्फत कोल्हापूर जिल्हयात सयाजी हॉटेलमध्ये मित्र चे उपाध्यक्ष व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.शाश्वत परिषदेमधील घोषणा जिल्ह्याच्या विकासात्मक उपक्रमासाठी ऐतिहासिक पाऊल ठरेल असे मत स्मॅक चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.

जैन यांनी सांगितले की, या परिषदेमधून कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी कोल्हापूर परिषद घोषणापत्र – २०२४ ची निर्मिती चर्चासत्रानंतर करण्यात आली. जिल्ह्याची विकासाबद्दल त्या त्या क्षेत्रात निश्चित दिशा देण्यासाठी या घोषणापत्राची मदत होणार आहे. मित्र चे अध्यक्ष परिषदेच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे हे आहेत. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी मित्रा संस्थेचे सीईओ प्रविणसिंह परदेशी, जॉइंट सीईओ अमन मित्तल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

प्रमुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे फाउंड्री आणि इंजिनिअरिंग हब म्हणून घोषित करणे, जेणे करून वस्त्रोद्योगच्या धर्तीवर वीज दर आणि व्याजामध्ये सवलत मिळू शकेल. भारतामध्ये सध्या फाउंड्रीची तीन क्षेत्र आहेत यामध्ये तामिळनाडू मधील कोईमतुर, गुजरात मधील राजकोट आणि महाराष्ट्र मधील कोल्हापूर, सांगली सातारा. या तिन्ही राज्यात कोल्हापूर अगेसर आहे. भारतामध्ये चायना प्लस हे धोरण आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फाउंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जागतिक फाउंड्रीज मधून कोल्हापूरमध्ये गुंतवणूक यावी हा मुख्य हेतू आहे. फाउंड्री हब मुळे नोकऱ्यांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. २०१६ साली स्मॅक भवनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इतर विषयाबरोबर फाउंड्री हब हा एक प्रमुख मुद्दा मांडण्यात आला होता.

ऊर्जेच्या हस्तांतरणासाठी ओपन ॲक्सिस साठी महाराष्ट्र सरकार विविध करांच्या माध्यमातून परावृत्त करत आहे, हा मुद्दा सुद्धा परिषदेमध्ये मांडण्यात आला ज्या अनूवय ओपन एक्सेस चे धोरण सोयीचे होईल.

आयटीआयच्या माध्यमातून शिक्षित कुशल मनुष्यबळ मिळणे ज्यामध्ये मुलींचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्यांच्या क्षमते अनुसार त्यांना विशेष पॅकेज योजना देण्यात याव्यात यामुळे मुलींचा सहभाग वाढणार आहे हे तीन विषय प्रामुख्याने मांडण्यात आले.

ईव्ही घटक, एरोस्पेस आणि संरक्षण मध्ये फाउंड्री क्षेत्राचा विवधीकरण करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्यामुळे त्यात तिन्ही क्षेत्रांमध्ये फाउंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामधून पुरवठा वाढणार आहे.

हे घोषणापत्र विविध क्षेत्रांमध्ये वाढ, शाश्वतता आणि लवचिकता वाढवण्यासाठी मुख्य धोरणांचा समावेश करते. महाराष्ट्रातील $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार समिती [EAC] अहवालात ओळखलेले कोल्हापूर जिल्ह्याच्या वाढीला गती देणे हे या घोषणापत्राचे मुख्य लक्ष्य आहे. त्याचसाठी जिल्ह्यातील प्रमुख क्षेत्र ओळखले गेले आहेत आणि २०२८ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा जीडीपी तीन लाख कोटी साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील १८.१ सीएजीआर [CAGR] साध्य करण्यासाठी शिफारसी दिल्या आहेत.

२५ जून रोजी कोल्हापूरमध्ये आयोजित केली गेलेली ही पहिली शाश्वत परिषद फाउंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक नोंद होईल. हे विषय परिषदेमध्ये घेतल्याने त्याचे महाराष्ट्राच्या धोरणामध्ये रूपांतर होईल. ही घोषणा जिल्ह्याच्या विकासात्मक उपक्रमांसाठी एक मार्गदर्शक दस्तऐवज म्हणून काम करेल, कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी सुनिश्चित करेल.

बाबासो कोंडेकर,कमलाकांत कुलकर्णी, नितीनचंद्र दळवाई, स्वरूप कदम, हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, विठ्ठल पाटील, विनय खोबरे, राहुल पाटील, अजय सप्रे, सारंग जाधव, प्रताप पाटील, शांताराम सुर्वे, राहुल मेंच, रणजीत नार्वेकर, आदित्य बेडेकर, डॉ. व्ही. बी. गेडाम, डॉ. गोविंद यागे, अमरजा निंबाळकर, उज्वल नागेश्वर, सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, सतीश भुतडा, बाळासाहेब पाटील या पाचही क्षेत्रांच्या प्रमुखांचे सहकार्य लाभले.

पत्रकार परिषदेस मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, आयआयएफ चे खजानिस अभिषेक सोनी, स्मॅक चे खजानिस बदाम पाटील, निमंत्रित सदस्य संजय भगत, दीपक घोंगडी, अनिल दटमजगे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी दूरगामी परिणाम ठरणाऱ्या या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजेश क्षीरसागर यांचे परिषदेमध्ये सहभागी सर्व क्षेत्राकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!