निधी उपल्बधतेतून रेंगाळलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुर्णत्वाचे भाग्य लाभले* *राजे समरजितसिंह घाटगे* *शेतकऱ्यांसोबत आंबेओहोळ प्रकल्पातील जलपूजन सोहळा*

Spread the news

*निधी उपल्बधतेतून रेंगाळलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुर्णत्वाचे भाग्य लाभले*

*राजे समरजितसिंह घाटगे*

*शेतकऱ्यांसोबत आंबेओहोळ प्रकल्पातील जलपूजन सोहळा*

उत्तूर प्रतिनिधी

उत्तूर परिसराला वरदान ठरणारा आंबेओहोळ प्रकल्प नुकताच गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 100% भरला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न सत्यात साकारत आहे. या धरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून रेंगाळलेले काम पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभले.असे भावपूर्ण उदगार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी काढले.
आंबेओहोळ प्रकल्प 100% भरल्यानंतर या पाण्याच्या पूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पातील पाणी पूजन श्री घाटगे यांच्या हस्ते या परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थान मध्ये जलक्रांती केली. त्यांचाच वारसा कृतीतून चालविलेल्या स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जलपूजनाचा मान या शेतकऱ्यांनी मला दिला. त्यांचे हे ऋण मी विसरू शकत नाही. मात्र या निमित्ताने स्व. राजे साहेब यांना अपेक्षित असलेला शाश्वत विकास या परिसरात साकारत आहे.या पाण्याचा लाभ राजकारण विरहितपणे सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जनार्दन निऊंगरे म्हणाले,स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प तब्बल वीस वर्षे रेंगाळला होता.राजे समरजितसिंह घाटगे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे भाजप शासनाच्या माध्यमातून 227.54 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे या प्रकल्पाचे काम मार्गी लागले.गतवर्षी सर्वत्र पाणीटंचाई भासत असताना या प्रकल्पामुळे आजरा गडहिंग्लज परिसरात शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला.

यावेळी सरपंच रुपाली पाटील,धोंडीराम सावंत,प्रविण लोकरे,धनाजी उत्तूरकर,प्रकाश पिटील,विनायक पाटील,श्रीमंत कदम,सुर्यकांत पाटील,शिवाजीराव जाधव,बाजीराव लखांबळे, यांचेसह शेतकरी उपस्थित होते

छायाचित्र आंबेओहळ येथील धरणातील पाणी पुजन वेळी शेतकऱ्यांसमवेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!