अंबाई टँकचे रुपडे पालटणार- आमदार अमल महाडिक यांची ग्वाही*

Spread the news

*अंबाई टँकचे रुपडे पालटणार- आमदार अमल महाडिक यांची ग्वाही*
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंबाई जलतरण तलावावर आबालावृद्धांची पोहण्यासाठी गर्दी व्हायची. अनेकांनी पोहण्याचे धडे याच तलावावर गिरवले पण गेल्या काही वर्षांपासून हा तलाव बंद अवस्थेत आहे. जलतरण तलावातील फरशा फुटल्या असून फिल्टरेशन प्लांट बंद आहे. बंद अवस्थेतील अंबाई जलतरण तलावामुळे जलतरणपटू आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अंबाई जलतरण तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलतरण तलाव नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. अद्ययावत आणि सुसज्ज अंबाई जलतरण तलावासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी खेचून आणू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अंबाई जलतरण तलावासाठी निधी कमी पडू देणार नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जलतरण तलाव व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. जलतरण तलावा बरोबरच अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांट, चेंजिंग रूम शॉवर रूम आणि गॅलरी यांच्या उभारणीमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे निर्देश महाडिक यांनी दिले.
लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून जलतरण तलावाशेजारी आणखी एक छोटेखानी तलाव उभारता येईल का? याचीही पाहणी आमदार महाडिक यांनी केली.
अंबाई टॅंक परिसरातील बंद अवस्थेत असलेला कारंजा आणि रंकाळा पदपथ उद्यानातील मोडकळीस आलेली खेळणीही बदलण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.लवकरात लवकर निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देशही महाडिक यांनी दिले.
यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, विनय खोपडे उपस्थित होते.

  1. U­

 



Spread the news

You may also like

error: Content is protected !!