*दक्षिणमधील उपनगरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार – अमल महाडिक*
कोल्हापूर – दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरांमधील भागातील नागरिक येथील खराब रस्ते, पाणीप्रश्न व कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. या सर्व समस्यांकडे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भागातील नागरिक त्रस्त आहेत. या सर्व समस्यांह अन्य समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे अभिवचन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी दिले.
सुर्वे नगर व जिवबा नाना पार्क येथील मतदारांशी प्रचारानिमित्त ते संवाद साधत होते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना ते सोडविण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.
या भागातील रस्त्यांची अवस्था बदलून त्यांचा कायापालट करणार आहे. उपनगरांमध्ये मूलभूत सुविधांसह काही विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी आराखडा करणार आहे. पायाभूत सुविधांसह नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा हेच माझे सुरुवातीपासूनचे ध्येय आहे.
यावेळी परिसरातील नागरिकांनी महाडिक यांचे सर्व महिलांनी अगत्यपूर्वक स्वागत केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेल्या पावलामुळे आम्हांला फार मोठा आधार झाला आहे. अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
महायुती सरकारच्या मुलींना मोफत शिक्षण, तरुणांना विद्यावेतन, २५ हजार महिला पोलिसांची भरती अशा विविध योजनांचा उल्लेख करत महिलांनी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करणार असल्याचा शब्द अमल यांना दिला.
यावेळी उमेश हळदकर, सचिन साळोखे, अजित खोत, राजू डोईफोडे, प्रथमेश कांदळकर, जलील नाकाडे, ऋषभ पवार, प्रतिक पाटील, अमित चरणकर, मनिषा निंबाळकर, उमा कदम, जया पाडे, सुषमा माळवदे, स्मिता पोवार, सौ. देसाई, सौ. सुतार, निखिल पजइ, अर्केश जाधव, विनायक तेली, एन. आर. पाटील, इम्रान बेळगावकर, गाणी मुजावर, वर्षा तेली, जाधव वाहिनी, मनिषा पारकर, अंजना पाटील, आयेशा मुल्ला, सचिन रानगे, दिलीप हळदकर, काशिदकर, लक्ष्मी रानगे, पूनम जाधव, सुषमा हळदकर, अश्विनी हळदकर, मनिषा जाधव, सारिका घोरपडे, रंजना बाबर, सुनीता सुर्वे, राणाप्रताप सासणे, मारुती कलविकटे, बकरे, मनोहर देसाई, सचिन खटावकर, रोहन सुळगावकर, योगेश चरणकर, श्री. बागडी, गुडेकर, राजू वडगावकर, राहुल खटावकर, सौ. कलविकटे, देसाई काकी, सौ. जाधव, स्वप्नाली वाडकर, सौ. बोबडे, मंगल चौगुले यांच्यासह भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
*चौकट*
*भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार*
या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करणार असल्याचा शब्द महाडिक यांनी यावेळी दिला.