*महिलांना आई समान मानून सन्मान देणारे नेते अमल महाडिक – अमोल माने*
कोल्हापूर – ‘परस्त्री मातेसमान’ मानत महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे संस्कार सौ. मंगलताई महाडिक यांनी अमल महाडिक यांच्यावर केले आहेत. महाडिक परिवारातील प्रत्येकजण याच संस्कारात मोठे झाले आहेत. आजवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केले आहे. अमल महाडिक स्त्रियांचा आदर करणारे नेते आहेत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक व शिवसेना चे दक्षिण शहर उपप्रमुख अमोल माने यांनी केले.
साने गुरुजी वसाहत येथे महिला बचत गटातील महिलांसाठी आयोजित ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवत असताना महिलांच्या संदर्भातील योजनांना अमल यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वेळोवेळी शिबिरे आयोजित करून मार्गदर्शक कार्यक्रम राबवले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भागातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळावा म्हणून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरे घेतली. आज १ लाखाहून अधिक महिला याचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. महाडिक यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
“परिसरातील सर्व महिलांना ते नेहमीच विनम्रतेची वागणूक देत आले आहेत. म्हणून महिला भगिनी अगदी हक्काने त्यांच्याकडे येऊन आपले गाऱ्हाणे मांडत असतात. सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर अंतिम तोडगा निघेपर्यंत ते गप्प बसत नाहीत, ही त्यांची खासियत आहे. ते स्वतः मितभाषी असले तरी त्यांचे काम बोलते. त्यांच्या कृतीतून त्यांच्या स्वभावाची प्रचिती सर्वाना येत असते.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाडिक यांच्या आई मंगलाताई महाडिक यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. “अमल यांना मिळालेल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात त्याने शक्य होईल ती सर्व विकासकामे केली. अनेक प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावली. या काळात त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाचा अनुभव सर्वांना आला आहे. केवळ त्यांनी आपल्या कामाची टिमकी वाजवली नाही. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले नाही. आजही तो प्रत्येक माणसासाठी उभा राहतो. त्यांच्या रक्तातच समाजकारण भिनले आहे. तो निवडून आला तर तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. २० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी साधनाताई महाडिक, डॉ. सोनाली पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, सोमनाथ सुतार, अमरजा पाटील, शिवसेनेच्या माजी नगरसेवक मनीषा कुंभार, तानाजी इंगळे, अविनाश कुंभार, प्रशांत साळुंखे, मोहन खोत, सुनील घोडके, शिवाजी पाटील, मारुती असनेकर यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.