*शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांची सर्वपक्षीय वज्रमूठ*
*शेतकरी व सामान्य नागरिकांचा एक लाखांचा मोर्चा कोल्हापुरात निघणार*
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरात शक्ती पीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी निर्धार मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवत कोणत्याही प्रकारची तडजोड न करता एक इंच देखील जमीन या महामार्गासाठी देणार नाही असे एकमताने ठरवण्यात आले. हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नवे तर नागरिकांचा देखील आहे त्यामुळे सर्वांना संघटित करून संघर्ष तीव्र करण्याच्या निर्णय घेण्यात आला.*अध्यक्षस्थानी संजय बाबा घाटगे होते.*
*यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले*,”शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या वर संकट कोसळणार आहे. समृद्धी मोदी सरकारने जमीन अधिग्रहण कायद्यात बदल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तसाच महाविकास आघाडीने जमीन अधिग्रणात मोबदला चार पट ऐवजी दोन पट केला. शेतकऱ्यांना लढल्याशिवाय इथून पुढचे दिवस अवघड असतील.
*सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले*,” विधानसभेत इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न शिल्लक असताना त्यामध्ये इतकी घाई दाखवली नाही जितकी घाई शक्तीपीठ महामार्ग निर्णय घेण्यासाठी सरकारने दाखवली. शक्तीपीठ महामार्ग हा जनतेच्या खिशातून टोल वसुलीसाठी व सरकारने कमिशन साठी आणला आहे. यातून केवळ कंत्राटदार लॉबीनचे भले होणार आहे. कोणीतरी मोबदला देतो म्हटल्यास शेतकऱ्यांनी त्याला बळी न पडता एकजुटीने जमीन न देण्याची शपथ घ्या.
*अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी म्हणाले*,” हा देश शेतकऱ्यांच्या कष्टामुळे अन्नधान्य बाबतीत स्वयंपूर्ण होऊन तरला आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. भविष्यात जल जंगल जमीन शेती कंत्राटदारांना घशात घालण्यासाठी सरकार दलाली करेल त्या विरोधात सर्व गट तट संघटनांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. कोल्हापूरकरांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्यास समृद्धी महामार्ग निश्चित रद्द होईल.
*समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले*, ” शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यावरणाची हानी होणारच आहे शिवाय जैवविविधता व जंगली प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊन या प्राण्यांकडून शेती उध्वस्त होईल व गाव वस्त्यांमध्ये हे प्राणी अनेकांचे जीव घेतील. नवयुग सारख्या कंपनीकडून इलेक्ट्रॉल बोंड खरेदी केलेल्या बीजेपी ने समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग देखील या कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. आम्हाला शाहू महाराजांची शेती धोरण पाहिजे महाराज सरकारचे शेती धोरण नको.”
*डॉ. भारत पाटणकर म्हणाले*,” अगोदर अनेक प्रकल्पांमध्ये शेतकरी ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत त्यांना वर्षाने वर्षे पुनर्वसन झाले तर नाहीच मोबदला देखील मिळालेला नाही.
*संजय बाबा घाटगे* म्हणाले,” नागपूरकरांना गोव्याची दारू व खनिज संपत्ती वाहतूक करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग हवा आहे. शेतकऱ्यांना या महामार्गाचा काडी इतका देखील उपयोग नाही. भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाय जरी ठेवला तरी ते सही सलामत परत जाऊ शकणार नाहीत.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले. आभार किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी नामदेव पाटील यांनी मानले.*
*यावेळी संपत बापू पवार पाटील, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, अमरीश घाटगे, मच्छिंद्र मुगडे, सुधाकर पाटील, भगवान पाटील, यांची भाषणे झाली.*
*यावेळी प्रसाद खोबरे, सम्राट मोरे, शशिकांत खोत,संभाजी पाटील, योगेश कुळवमोडे, जम्बू चौगुले, तानाजी भोसले, बाळासाहेब पाटील, तात्यासो पाटील, प्रशांत आंबी, आकाश भास्कर, शिवाजी कांबळे, सर्जेराव देसाई, के.के. भारतीय,बबलू वडणगेकर, मल्हारी पाटील यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*ठरावाचे वाचन के डी पाटील, अभय व्हनवडे यांनी केले.*
*मेळाव्यात खालील प्रमाणे ठराव करण्यात आले*
१) गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर सहीत बारा जिल्यातील शेतकयांची एक इंचही जमीन देणार नाही.
२) राज्यातील मागील काही वर्षात रस्ते निर्मिती मधे पारदर्शकता राहिलेली नाही. याअगोदरील रस्ते व प्रस्तावित रस्ते या वर महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी.
3) रा. शाहू महाराजानी शेतक-यांसाठी कल्याणकारी धोरण राबविले. महाराष्ट्र शामत मात्र शेतकऱ्यांचे शोषण होणारे धोरण राबवीत आहे.
आम्ही ठराव करीत आहोत आम्हाला रा. शाहू महाराजांचे शेती धोरण हवे, महाराष्ट्र सरकारचे शेती धोरण नको.
४) याअगोदर सरकारने घेऊन सांगली महामार्ग, रत्नागिरी-नागपूर महामार्ग केले आहेत. त्यांचाच विस्तार करावा! शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. गोवा ते नागपूर जलदगती वंदे भारत सारखी रेल्वे सुरू करावी.
*आंदोलनाची पुढचे दिशा*
1) 5 एप्रिल ते 15 एप्रिल गावागावांमध्ये दोन लाख सह्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात संकलित करून शासनाला पाठवणार.
2) 15 एप्रिल ते 30 एप्रिल स्थानिक आमदारांना शक्तीपीठ महामार्ग विरोधात निवेदन देऊन भूमिका जाहीर करण्याच्या आग्रह करणार.
3) महामार्ग विरोधात गावागावात ग्रामसभेचे ठराव करणार.
4) 10 मे रोजी जिल्ह्याची बैठक बोलवून एक लाख लोकांच्या मोर्चाचे नियोजन करणार.