भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या नूतन पदाधिका-यांची निवड
कोल्हापूर, ता. २६ : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप खांडेकर, तर कार्याध्यक्षपदी हेमंत साळोखे व सुखदेव गिरी यांची निवड करण्यात आली. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्याची नुकतीच घोषणा केली.
या वेळी उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण (पुणे), सत्यजित भोसले (मुंबई), शशिकांत दगडू खुने (धाराशिव), चैत्राली कारेकर (कल्याण) व प्रशांत दरेकर (रायगड) यांची निवड करण्यात आली. तर अमर पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
सन्माननीय कार्यकारणी सदस्यांत फत्तेसिंह सावंत, इंद्रजित सावंत, सागर यादव, इंद्रसेन जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.
फत्तेसिंह सावंत समितीचे तेरा वर्षे अध्यक्ष होते. या काळात त्यांचा शिवराज्याभिषेकाच्या नियोजनात सक्रिय सहभाग राहिला. अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द उत्कृष्ट ठरली. निवडीनंतर त्यांचा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते व युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक फाळके, संजय पोवार, प्रवीण हुबाळे, राहुल शिंदे, प्रवीण पोवार, प्रसन्न मोहिते, उदय घोरपडे उपस्थित होते.