*केडीसीसी बँकेच्या सर्व शाखा आज गुढीपाडव्यादिवशीही सुरूच राहणार……*
*नऊ हजार कोटी ठेवीसह, १६ हजार कोटी संयुक्त व्यवसायाचा टप्पा बँकेने यशस्वीरित्या पार केला…..*
*कोल्हापूर, दि .३१ :*
*कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा मंगळवारी ता. नऊ गुढीपाडव्यादिवशही सुरूच राहणार आहेत. बँकेच्या विविध ठेव योजनांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शाखा सुरू राहणार आहेत. ग्राहकांनी या शुभ मुहूर्तावर जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी केले आहे.*
*मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे, केडीसीसी बँकेने दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट घेतले आहे.*
*दरम्यान, दि.३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या ठेवी रु. नऊ हजार कोटी झाल्या आहेत. सी. आर. ए. आर. १४ टक्क्यांपेक्षा जास्त असून निव्वळ एनपीए शून्य टक्के इतका आहे. बँकेचा संयुक्त व्यवसाय रु. १६, ०२२ कोटी झाला असून बँकेच्या सर्व म्हणजेच १९१ शाखा नफ्यात आहेत. शेतकऱ्यांना शून्य % व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी रुपये पाच लाखापर्यंतचे पीककर्ज देणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे. शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यास विमा संरक्षण देण्यासाठी बँकेने विमा सुरक्षाकवचही लागू केले आहे.*
*दि. ३१ मार्च २०२४ अखेर के. डी. सी. सी. बँकेचे आर्थिक मानदंड असे……..!*
■ ढोबळ नफा :२४२ कोटी
■ ठेवी : ९०४५ कोटी
■ कर्जे : ६९७७ कोटी
■ एकूण व्यवसाय : १६०२२ कोटी
■ भाग भांडवल : २८५ कोटी
■ निधी : ७२१ कोटी
■ नक्त एनपीए : शून्य टक्के
■ सी. आर. ए. आर. : १४% पेक्षा जास्त
*****