Spread the news

अखेर 22 दिवसांनी केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

कोल्हापूर

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीत दुर्घटने प्रकरणी अखेर तब्बल 22 दिवसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून नाट्यगृहाचे अतिरिक्त व्यवस्थापक समीर महाब्री यांनी ही तक्रार दाखल केली. आठ ऑगस्ट रोजी रात्री हे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडले होते.

22 दिवसांपूर्वी रात्री केशवराव भोसले नाट्यगृहाला अचानक आग लागली. यामध्ये नाट्यगृहाचे 17 कोटी रुपयांचे नुकसान झाले. नाट्यगृहातील कौले, लोखंडी पत्रे याशिवाय दरवाजे, खिडक्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. याबाबत गुन्हा दाखल करावा यासाठी कृती समितीच्या वतीने मागणी सुरू होती. पण, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरू होती. अखेर 22 दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे करत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!