दत्तक वळीवडे या गावाकडे ऋतुराज पाटील यांचे अक्षम्य दुर्लक्ष* : अमल महाडिक

Spread the news

*दत्तक वळीवडे या गावाकडे ऋतुराज पाटील यांचे अक्षम्य दुर्लक्ष* : अमल महाडिक
कोल्हापूर :
दक्षिण मतदार संघातील हा वळीवडे भाग पूरग्रस्त म्हणून ओळखला जातो. पुरात दयनीय अवस्थेला पोचलेलं हे गाव पुर्नबांधणीसाठी दत्तक घेतल्याचे विद्यमान आमदारांनी जाहीर केले होते. पण गेल्या पाच वर्षांपासून या गावाकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष हे अक्षम्य आहे. गेल्या पाच वर्षात ते इकडे फिरकलेलेही नाहीत. पुर्नबांधणीचं वचन देवूनही त्यांनी या गावाची जबाबदारी झटकली असली तरी, मी तुमच्यासोबत नेहमीच असेन, असा विश्वास अमल महाडिक यांनी वळीवडे गावातील ग्रामस्थांना दिला.
दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ वळीवडे गावात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अमल महाडिक यांच्या पदयात्रेला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अमल महाडिक म्हणाले, विद्यमान आमदारांनी जाहीरनाम्यातील कुठलही काम पूर्ण केलेलं नाही. मात्र उद्घाटनाचे नारळ तेवढे फोडले. त्यांच्या स्कॅन कोड चा सगळा प्रकर आता जनतेच्य ही लक्षात आला आहे. दक्षिण मधील रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन अशा मुद्द्यांसह भागातील अनेक विकासाची कामे नक्कीच पूर्णत्वास नेईन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी अनिल पांढरे, बाबसो पाटील (तात्या), उदय पाटील, उदय पोवार, बाळासो पवार (अंकल), विक्रम मोहिते, महेश मोरे, शिवाजी खांडेकर, संजय चौगुले, दिलीप पवार (डी एस पी), रावसो दिगंबर (अण्णा), दिग्विजय चव्हाण, शशिकांत खांडेकर, प्रशांत जाधव, राणी नार्वेकर, स्वाती इंगवले, मेघा मोहिते, राधिका मोरे, अनिता पाटील, जितू कुसाळे, दीपक पाटील, सनी मोरे, धनाजी शिंदे, प्रदीप खांडेकर, गणेश मोरे, संदीप पवार, सौ.मीना गुरव, सौ. विद्या चव्हाण, मनोहर गवळी, विशाल जगदाळे, अरुण शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट
लडकी बहिण चा पहिला भाग निवडणूक़ीसाठी आशिर्वाद
वळीवडे गावातील पदयात्रे दरम्यान, गावातील 86 वर्षांच्या अक्काताई बाबुराव कोगनोळी या आजीनी शंभर रुपये अमल महाडिक यांच्या खिशात ठेवत म्हणाल्या, पोरा, लाडकी बहिण योजनेचे पैसे तुझ्यामुळे मिळाले. यातला पहिला भाग तुझ्या निवडणुकसाठी तू वापर. असा आशिर्वाद अमल महाडिक यांना दिला. यावेळी सर्व लोक भारावून गेले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!