भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक संपन्न*

Spread the news

*भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक संपन्न*

  1. U­

 

कोल्हापूर दि. २ मार्च संघटन पर्व 2025 अंतर्गत चौथा टप्पा सुरू झाला असून या चौथ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष निवडी नजीकच्या काळातच होतील. भाजपच्या पक्षशिस्ती प्रमाणे सदरच्या मंडलाध्यक्ष निवडी होणार असून या निवडीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सभासद नोंदणी, बूथ समिती, बुथ अध्यक्ष निवडी या प्रक्रिया लवकरच पूर्ण करून घ्याव्यात असे आवाहन पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर पश्चिम कोल्हापूर पूर्व व कोल्हापूर महानगर जिल्ह्याच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते .
याप्रसंगी माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना संघटन मंत्री मकरंद देशपांडे म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक ताकदीवर नेहमीच विश्वास ठेवणारी पार्टी आहे. संघटन आणि प्रशासन याची सांगड घालून काम करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहिले जाते. यासाठी संघटन मजबूत करण्याची कामे नेहमीच सुरू असतात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका येत असतात त्याच निवडणुका पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहावे.
यावेळी बोलताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. हे सुरू असतानाच संघटनात्मक बांधणीमध्ये संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना ही तितकेच महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टीने नव्या धोरणानुसार 100 बुथला एक मंडल अशी संघटनात्मक रचना नव्यानेच सुरू करण्यात येत असून संघटनात्मक कामात नवनवीन प्रयोग करणारी आपली पार्टी आहे. जनतेपर्यंत लोकांपर्यंत आणि समाजापर्यंत सरकारची आणि पक्षाची ध्येय धोरणे गतीने पोहचावीत यासाठीच नवीन मंडल रचना अस्तित्वात आणली असून या रचनेमुळे अनेक प्रभावी कार्यकर्त्यांना पदाधिकारी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या नवीन संघटनात्मक रचनेमध्ये सहभागी होऊन पक्ष बांधण्यासाठी आपला वेळ द्यावा.
यावेळी महानगर जिल्ह्याचा संघटनात्मक बांधणीचा आढावा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर पश्चिम जिल्ह्याच्या आढावा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, कोल्हापूर पूर्व जिल्ह्याचा आढावा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी घेतला.
यावेळी भाजपा प्रदेश कोल्हापूर महानगर प्रवासी नेते भरत पाटील, राहुल चिकोडे, शिवाजी बुवा, डॉ. राजवर्धन, गायत्री राऊत यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  •  

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!