*बी.वाय. माळी समाजरत्न, आनंदी माळी यांना आदर्श माता पुरस्कार* रविवारी होणार वितरण *लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर *तेरवाडचे माळी कुटुंब आदर्श*

Spread the news

*बी.वाय. माळी समाजरत्न, आनंदी माळी यांना आदर्श माता पुरस्कार* रविवारी होणार वितरण

*लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर

*तेरवाडचे माळी कुटुंब आदर्श*

कोल्हापूर

लिंगायत समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा समाज रत्न पुरस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. प्रा. बी. वाय. माळी समाज रत्न तर आदर्श माता पुरस्कार आनंदी गणपतराव माळी यांना जाहीर झाला आहे. थेरवाड येथील सदाशिव माळी यांच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा जून रोजी शाहू स्मारक येथे दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.

लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने दरवर्षी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. डॉ. माळी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील काम उल्लेखनीय असून त्यांनी विविध पदे भूषवितानाच समित्यावर काम करत आहेत. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर ते सध्या रा. शाहू मेडिकल कॉलेज मध्ये विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे जवळजवळ साडेतीन हजार पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यानी अध्यापन करून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. भारतभर त्यांचे विद्यार्थी वैद्यकीय तज्ञ व विशेष तज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत.

आनंदी गणपतराव माळी यांनी अतिशय संघर्षातून कुटुंबाचा डोलारा सांभाळताना मुलांना शिक्षित करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शिरोळ तालुक्यातील थेरवाड येथील सदाशिव माळी यांच्या संयुक्त कुटुंबात तब्बल 52 सदस्य आहेत. हे आजच्या काळात निश्चितच एकत्र कुटुंब पद्धतीला प्रेरणादायी आहे. त्यामुळे आदर्श कुटुंब म्हणून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते 16 जून रोजी करण्यात येणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!