केआयटी मध्ये इनोव्हेशन सेलचा ‘एक्सलरेटर मिट ’ कार्यक्रम संपन्न
एआयसीटीई व आयआयसी सह उच्च शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेलचा सहभाग
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये एआयसीटीई व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांची दि. ३१ जुलै २०२४ रोजी ‘एक्सलरेटर मिट’ संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या पश्चिम क्षेत्राच्या वतीने करण्यात आले होते.
परिसरातील महाविद्यालयातील आय.आय.सी निमंत्रक, इनक्यूबेटर,इनव्हेस्टर, इंडस्ट्री लीडर,आय.पी. विषयातील तज्ञ, स्टार्टअप्स सुरू करणारे,त्यांना मार्गदर्शन करणारे तसेच इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल मधील सदस्य अशा सर्वांचा एकमेकांशी समन्वय वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
दोन सत्रात नियोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विविध तज्ञ मंडळींशी चर्चात्मक संवादासह प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होता. केआयटी चे संचालक व मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब चे मार्गदर्शक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. केआयटीच्या मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब ची संपूर्णतः माहिती, स्थानिक उद्योजक व उद्योग क्षेत्राचे योगदान, त्याचबरोबर निधी आयटीबीआय यांच्या सहकार्याने नव उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी आपण करत असलेले प्रयत्न यांची उपस्थितांना डॉ.मोहन वनरोट्टी यांनी माहिती करून दिली. श्री.उमेश राठोड इनोव्हेशन मॅनेजर (पश्चिम विभाग) यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या विविध उपक्रमांची व प्रगतीची माहिती उपस्थित त्यांना करून दिली. केआयटीच्या मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब ला सुद्धा त्यांनी भेट देऊन केआयटीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. भविष्यामध्ये स्टार्टअप्स ना सहकार्य करून त्याचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आपल्या संबंधित घटकांचा सातत्याने समन्वय व सहकार्य राहिले पाहिजे याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब चे प्रमुख डॉ.दत्तात्रय साठे व केआयटी आय.आर.एफ. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर आरळी यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री साजिद हुदली, सचिव श्री दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले
फोटो तपशील :-
फोटो क्क
kआयटी येथे संपन्न झालेल्या ‘एक्सलरेटर मीट’ मध्ये मार्गदर्शन करताना शासनाच्या पश्चिम क्षेत्राचे इनोवेशन मॅनेजर श्री.उमेश राठोड सोबत डावीकडून कार्यक्रम समन्वयक डॉ. डी.जे. साठे, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, कार्यक्रम समन्वयक श्री.सुधीर आरळी.