आमदार सतेज पाटील पुणे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक
प्रांताध्यक्ष सपकाळ यांनी केली नियुक्ती
कोल्हापूर
विधान परिषदेचे गटनेते आमदार व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतेज पाटील यांची काँग्रेसच्या पुणे जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत आहे.
प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून आमदार पाटील यांची नियुक्ती पुणे शहर जिल्ह्याच्या निरीक्षक पदी करण्यात आली आहे.
पुणे शहर जिल्ह्यात जाऊन सर्व ब्लॉक अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या ब्लॉक निहाय बैठका घ्याव्यात व आपला अहवाल १५ दिवसांत प्रदेश कार्यालयाला सादर करावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.