आमदार सतेज पाटील यांचा आज वाढदिवस
विविध उपक्रम
कोल्हापूर
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतेज पाटील यांचा शनिवारी 53 वा वाढदिवस साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीद जिल्ह्यातील अनेक संस्था संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
आमदार सतेज पाटील हे गेले 30 वर्षे राजकारणात असून आमदार, गटनेते, जिल्हाध्यक्ष या विविध पदावर काम करत असताना त्यांनी पक्ष संघटना भक्कम केली आहे. विविध संस्था ताब्यात घेत असताना त्यांचा विकासही केला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, कॅरम, बैलगाडी या विविध स्पर्धा व फळ वाटप रक्तदान शिबिर यांच्या आयोजन केले आहे. आमदार सतेज पाटील हे शनिवारी दुपारी चार नंतर कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.