पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यां सह नागरिकांची अलोट गर्दी* *१२६० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा बाहुबली रेडा प्रदर्शनाचे खास आकर्षण*

Spread the news

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२४” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी शनिवारी तपोवन मैदानावर गर्दी केली होती. यावर्षीचे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला,विदेशी भाजीपाला,फुले,जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी विभागाने तयार केलेली शेतीविषयक डेमो,शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे.प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी एकूण दोन कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.
प्रदर्शनात *मातोश्री फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती १२६० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. त्यापासून झालेल्या अपत्याचे वजन हे ६० किलोच्या पुढे आहे तर म्हैशीचे दूध २२ लिटर इतके आहे.बाहुबली रेडा दिवसाला दहा लिटर दूध पितो, तीन किलो हरभरा डाळ खातो,पावशेर तूप,५ अंडी, चंदी आणि मुरघास खातो त्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची उंची ५.६ इंच आहे लांबी ८.८ इंच आहे.*

कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड, वर्षाला ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी प्रदर्शनाचे ठरत आहे.याचबरोबर गडहिंग्लज येथील हसुरचंपू गावातील स्वप्निल पवार यांचा तेराशे १३६० किलो वजनाचा युवराज रेडा जो ३८ महिन्याचा आहे तोही आकर्षण ठरत आहे.
याचबरोबर विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी,कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई,नागदेववाडीतील २५ किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण*
विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण. याचबरोबर विविध कँपन्यांची उत्पादने विविध प्रकारची ट्रॅकटर्स मांडण्यात आली आहेत हेही आकर्षण ठरत आहेत.

*विविध कंपन्या व उत्पादनांचा सहभाग*

या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या असून यामध्ये गोकुळ दूध संघ व त्यांची उत्पादने,ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ दूध संघ,या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या आहेत. शेतीची अवजारे, खते औषधे,आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.या कंपन्याची उत्पादने पाहावयास मिळत आहेत.व शेतकरी या साहित्यांची खरेदी करत आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळत आहेत.खरेदी केली जात आहे.व खाद्य महोत्सव अंतर्गत विविध खाद्य पदार्थांवर शेतकरी व नागरिक ताव मारत आहेत.

प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद,विविध फळे पेरू,मसाले,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे.

*प्रदर्शनात अशी आहेत जनावरे*

जनावरांमध्ये मसाई पठार येथील केदारलिंग देशी गोवंश गो शाळेतील सात वर्षाचा पैजासाठी वापर केला जाणारा सागर महाडिक यांचा वळू, काटेवाडी जातीचा शाहू घोडा जो पाच वर्षाचा आहे शंकर नावाचा ४३ महिन्याचा बेळगाव येथील आहे.दरडेवाडी तालुका आजरा येथील सर्जा,आणि साहिवाल कपिला गीर गाय जी चार वर्षे सहा महिन्याचे आहे, कोल्हापुरातील मंदार इंगवले यांचा क्राउड किंग नावाने परिचित असलेला कोल्हापूरकरांचा भुत्या हा घोडा जो आंघोळ घातल्यानंतर ओला झाल्यावर काळा दिसतो आणि वाळला की पांढरा दिसतो.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.ज्यात पांढरे रंगीबेरंगी कबुतरे,ससे,मांजर,बदक,पांढरे उंदीर राजहंस,लवबर्ड,पोपट आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत जे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

*भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश*

स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये सरबत फळ, कसबा नूल येथील राजगोंडा हबीगोंडे यांची एक फुटाची लाल मिरची युवराज कुंभार कुंभारवाडी राधानगरी यांचा यांचे बनकर फळ लाल कोबी बंडोपंत संकपाळ राहणार धनुरे कागल यांची बाजरी पांडुरंग गुरव यांचा लाल भोपळा लाल भोपळा,हळद, आदींसह विदेशी भाजीपालामध्ये सियसन आरकरली, बेसिस,तर फुलांमध्ये राधानगरी येथील संजय ता यांचा जरबेरा,भडगाव येथील निशिंगध,जिप्सी फिलिया,औरचिड अशा फुलांचा समावेश आहे.
याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत.ताव मारत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे.यात १२५ टन ऊस उत्पादकता, सुपर के नर्सरी टेक्निक, फनी डोळा दोन रुपयांपासून ३० पैशांपर्यंत खर्च कमी करून तंत्रज्ञान करणारे विकसित हे डेमो दाखवण्यात आले आहे, राधानगरी कृषी विभागांतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापनवर डेमो तयार करण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघात झाला तर त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याबाबत डेमो लावण्यात आलेला आहे शिवाय शेतामध्ये फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यावी हाही डेमो दाखविण्यात आलेला आहे. शिवाय शेती कशी करावी याची माहिती दिली जात आहे.

*आज होणारी व्याख्याने*

या प्रदर्शनात जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगांवचे वरिष्ठ कॄषीविद्यावेता सुरेश मगदूम हे
ऊस/केळी पिकासाठी ठिबक सिंचन काळाची गरज/ठिबक सिंचनाची काळजी व देखभाल व खत व्यवस्थापन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.तर मुरघास तंत्रज्ञ व सेक्सेल सिमेंन याविषयी मार्गदर्शन माहिती श्री चंद्रशेखर वसंत कुलकर्णी चितळे डेअरी आणि डॉ सतीश कोगनुळे चितळे जिनस ए. बी.एस हे मार्गदर्शन करणार आहेत.

देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व या प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.
सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनात पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अजून दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व संयोजकांनी केले आहे.आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली.सायंकाळी याठिकाणी जावेद नायकवडी कोल्हापूर यांचा सरगम कराओंके हा गाण्यांचा संगीत गायन कार्यक्रम झाला.

 

सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
1) सेंद्रीय गूळ : १००० kg
2) इंद्रायणी तांदूळ : २२०० kg
3) आजरा घनसाळ : २००० kg
4) सेंद्रीय हळद : ५०० kg
5) नाचणी : ४००kg


Spread the news

You may also like

error: Content is protected !!