*जिज्ञासा वाढवून शिकण्यासाठी प्रेरित करतो*
*तोच खरा शिक्षक – डॉ. एकनाथ आंबोकर*
आर.एस.सी विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
डी वाय पाटील युनिव्हर्सिटीमध्ये उपक्रम
कोल्हापूर
विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवून जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो तोच खरा शिक्षक असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले. डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लनरी (सी.आय.आर.) रिसर्च विभागात आयोजित रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्यावतीने (आर.एस.सी) आयोजित विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डी वाय पाटील युनिव्हर्सिटी च्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लनरी रिसर्च, इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने रूरल सायन्स एज्युकेशन ट्रेनिंग युटीलिटी प्रोग्रॅम अंतर्गत हा कार्यक्रम झाला. विज्ञान अध्यापनातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे, विज्ञान शिक्षकांसाठी प्रयोगशाळा-मुक्त प्रयोग संकल्पना राबिवणे, शाश्वत विज्ञान प्रयोगांचा शालेय स्तरावर प्रसार करणे, या उद्देशाने या 18 ते 21 सप्टेंबर या कालावधीत दोन सत्रामध्ये चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शहर परिसरातील १०० हून अधिक शिक्षक यात सहभागी झाले आहेत. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, आर.एस.सी. चे शिक्षक प्रशिक्षक हेमंत लागवणकर यांची प्रामुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आंबोकर म्हणाले, नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर असून अशा पद्धतीचं ट्रेनिंग कोल्हापूरमध्ये होत असल्याचा अभिमान आहे. याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे कौतुक आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी विचारप्रवण आणि कृतीप्रवण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रे आणि विज्ञान प्रात्यक्षिके यांच्या प्रशिक्षणाचा चांगला फयदा विज्ञान शिक्षकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रथम सत्रात जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी अध्यापनाच्या नवनवीन पद्धती अवलंबणे गरजेचे आहे. विद्यार्थीभिमुख अध्यापनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रांचा प्रभावी वापर आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभारी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकामध्ये सहयोगी प्राध्यापक डॉ. जयवंत गुंजकर यांनी या ट्रेनिंगची आवश्यकता आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्याचबरोबर इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स विषयी माहिती दिली.
रिसर्च डायरेक्टर डॉ. सी.डी.लोखंडे यांनी, सेंटर फॉर इंटरडीसीप्लनरी रिसर्च विभागामध्ये सुरू असणाऱ्या विविध कोर्सेस आणि अत्याधुनिक प्रयोगशाळांविषयी माहिती दिली. आतापर्यंत या विभागातील संशोधकांना ५० पेक्षा जास्त पेटंट मिळाले असून तितकेच पेटंट अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी पी. जी. आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थाना उत्तम प्लेसमेंट मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित शिक्षकांनी नववी, दहावीच्या विद्यार्थांना त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी संस्थेच्या प्रयोगशाळांना भेट देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपकुलसचिव संजय जाधव यांनी उपक्रमांची माहिती दिली. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वप्रसार व प्रचारासाठी विविध उपक्रम कार्यशाळा सातत्याने राबवल्या जातात. विशेषत: पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक जागृती पर कार्यक्रम घेतले जातात. त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले
या कार्यक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी डॉ. हितेश पवार, डॉ. विवेक पारकर, डॉ. मोहित त्यागी, डॉ. हेमराज यादव, डॉ. कृष्णनाथ शिर्के यांचे सहकार्य लाभले. यावेळी सहायक प्राध्यापक पूजा पाटील, उपकुलसचिव कृष्णात निर्मळ, विनोद पंडित, संशोधक विद्यार्थिनी सायली कुलकर्णी, इंटरडीसीप्लनरी रिसर्च विभागातील प्राध्यापक, व इतर स्टाफ उपस्थित होते.
कोल्हापूर: विज्ञान शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. एकनाथ आंबोकर. समवेत. आर. के. शर्मा, हेमंत लागवणकर, डॉ. सी.डी.लोखंडे, डॉ. जयवंत गुंजकर