गोकुळ संचालक अजित नरके यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांची शुभेच्छासाठी गर्दी – भारतीय कालगणनेच्या संस्कृती दिनदर्शिकेचे प्रकाशन
कोल्हापूर – आशिया खंडातील सर्वात मोठ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था गोकुळची सरकार संचालक आणि कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित शशिकांत नरके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज शिवाजी पेठेतील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागून राहिली होती . यावेळी भारतीय कालगणनेच्या कालगणनेच्या आधारित ‘संस्कृती दिनदर्शिका ‘ प्रकाशन गोकुळ चेअरमन अरुण डोंगळे, शशी तायशेटे , आमदार चंद्रदीप नरके , विश्वास नारायण तथा आबाजी पाटील, बाबासो चौगुले , राहुल खाडे तसेच कुंभी कासारी बँकेचे व्हाईस चेअरमन अरुण पाटील आणि पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . शिवाजी पेठेतील नरके यांच्या निवासस्थानी आज सकाळपासूनच राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिन सहकार सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती . पुष्पगुच्छ, पुस्तके तसेच विविध प्रकारची वृक्ष रोपे देवून केक कापून आणि पेढे – चॉकलेट देऊन मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील सहकारी दूध डेअरी संस्था पतसंस्था सरपंच – सदस्य तसेच गोकुळचे पदाधिकारी गोकुळ आणि कुंभी कासारी सहकारी बँकेचे तसेच साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा समावेश होता . राजवीर नरके आणि नरके परिवार, निलेश खंडागळे तसेच कार्यकर्त्यांनी सर्वांचे आदरातिथ्य केले . टीव्ही नेक्स्ट मराठी परिवाराच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंखे – नंदकुमार दिवटे आदिनी शुभेच्छा दिल्य